Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘गांधी गोडसे : एक युद्ध’ सिनेमाचा टिझर प्रदर्शित, चित्रपटात पाहायला मिळणार थरारक वैचारिक युद्ध

आतापर्यंत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित अनेक सिनेमे सिनेसृष्टीमधे बनले आहेत. मात्र आता दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचा आगामी ‘गांधी गोडसे-एक युद्ध’ हा सिनेमा काहीतरी वेगळा असणार हे नक्की सिनेमाचा टिझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. हा टिझर पाहून आपल्याला देखील विचार करायला एक वेगळी दिशा मिळणार आहे. राजकुमार संतोषी यांचे आधीचे सिनेमे बघता अतिशय हुशार आणि अभ्यासू दिग्दर्शक असे त्यांना म्हटले तरी वावगे ठरणार नाही. बऱ्याच वर्षांनी संतोषी ‘गांधी गोडसे-एक युद्ध’ या सिनेमातून दिग्दर्शन करताना दिसणार आहे.

‘गांधी गोडसे-एक युद्ध’ हा सिनेमाचा १ मिनिट ३२ सेकंदाचा टिझर पाहून तुम्हाला नक्कीच सिनेमात काहीतरी वेगळे जाणवून सिनेमा बघण्याची इच्छा होईल हे नक्की. टीझरच्या सुरुवातीलाच गांधी वध दाखवला आहे. बॅकग्राऊंडला एक आवाज येतो आणि म्हणतो, “दोन्ही दिग्ग्गजांवर अनेक गंभीर आरोप झाले. एकीकडे गांधींची हत्या होते, तर गोडसेंचा आवाज दाबला जातो. काळाने गोडसे यांना बोलण्यास वेळच दिला नाही, मात्र हा सिनेमा त्यांना बोलू देणार आहे.”

या सिनेमात गांधी आणि गोडसे समोरासमोर येणार असून गांधी त्यांची मते गोडसे यांना समजावताना दिसतील तर गोडसे त्यांच्या तर्काने त्यांची मते फोडताना पाहता येणार आहे. हा केवळ १ मिनिटांचा ट्रेलर बघताना आपल्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. इतका सुंदर आणि सजीव अभिनय, दमदार संवाद आपल्याला सिनेमा बघण्यास प्रवृत्त करतील.

राजकुमार संतोषी यांचा ‘ गांधी गोडसे : एक युद्ध’ हा सिनेमा २६ जानेवारीला प्रदर्शित होणार असून यात गांधी यांची भूमिका दीपक अंतानी यांनी तर गोडसे यांची भूमिका चिन्मय मांडलेकर यांनी निभावली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
उर्फी जावेदच्या वक्तव्यावर चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘मी तिला थोबडवून काढेन…’

मृणाल ठाकूरच्या नवीन दाक्षिणात्य चित्रपटाची घोषणा, नव्या भूमिकेतून येणार प्रेक्षकांसमोर

हे देखील वाचा