Monday, July 8, 2024

जगातील सर्वात सुंदर भावना सांगत राजकुमार रावने शेअर केला त्याच्या ट्रान्सफॉर्मेशनचा फोटो

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव हा त्याच्या प्रतिभासंपन्न अभिनयासाठी ओळखला जातो. त्याने त्याच्या करिअरमध्ये नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमधून स्वतःला सिद्ध केले आहे. आज राजकुमाराची गणना बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्यांमध्ये होते. नुकताच राजकुमारचा ‘बधाई दो’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमात राजकुमार एका हटके भूमिकेत सर्वांना दिसून येणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने राजकुमाराने पहिल्यांदाच सिक्स पॅक्स बनवले आहे. राजकुमारने त्याच्या या मोठ्या ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यासोबतच त्याचा या ट्रान्सफॉर्मेशनचा आणि सिनेमाचा निभाव देखील सांगितला आहे. राजकुमारने त्याचे आधी आणि नंतर अशा स्वरूपात फोटो शेअर केले आहे.

राजकुमारने त्याच्या दोन फोटोंचे कोलाज बनवत इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. या कोलाजमध्ये त्याचे दोन रूपं दिसत असून, एक फोटो तो ट्रेनिंग घेत असल्याचा आहे, तर दुसरा फोटो शूटिंगच्या सेटवरचा. दुसऱ्या फोटोमध्ये राजकुमरचे सिक्स पॅक्स स्पष्ट दिसत आहे. त्याची कमालीची आकर्षक बॉडी सर्वांनाच भुरळ घालत असून हा फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, “जगातील सर्वात सुंदर भावना तेव्हा निर्माण होते, जेव्हा तुम्ही एखाद्या सिनेमासाठी आणि एखाद्या भूमिकेसाठी तुमचे तन, मन देतात. आणि याच्या बदल्यात दर्शकांकडून तुम्हाला भरभरून प्रेम मिळते. तुमचे खूप आभार.” राजकुमाराच्या या फोटोवर नेटकरी मोठ्या प्रमाणावर रिऍक्ट होत असून त्याच्या या ट्रान्सफॉर्मेशनचे कौतुक करताना दिसत आहे.

राजकुमारचा ‘बधाई दो’ हा सिनेमा प्रदर्शित झाला असून, या चित्रपटातून समलैंगिकतेवर भाष्य केले आहे. अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीने हा संवेदनशील विषय सिनेमातून मांडण्यात आला आहे. या सिनेमात राजकुमार राव आणि भूमि पेडणेकर मुख्य भूमिका निभावत आहे. राजकुमारने न्यूटन, स्त्री, रुही, छलांग, सिटीलाईट, बरेली की बर्फी, द व्हाईट टायगर आदी चित्रपटांमधून तुफान लोकप्रियता मिळवली.

हेही वाचा

हे देखील वाचा