Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड ‘आयुष्य कधीच सांगत नाही…’ राजू श्रीवास्तव यांच्या यांच्या लेकीने दिली त्यांच्या शेवटच्या दिवसांची माहिती

‘आयुष्य कधीच सांगत नाही…’ राजू श्रीवास्तव यांच्या यांच्या लेकीने दिली त्यांच्या शेवटच्या दिवसांची माहिती

सुप्रसिद्ध विनोदवीर म्हणून संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेले राजू श्रीवास्तव यांचे काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेक दिवस त्यांच्या आठवणींना उजाळा दिला गेला. आता राजू श्रीवास्तव यांची मुलगी असलेल्या अंतराने समोर येत तिच्या वडिलांच्या शेवटच्या दिवसांबद्दल सर्वांना माहिती दिली आहे. राजू श्रीवास्तव हे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात भरती होते. १० ऑगस्ट रोजी राजू यांना एम्समध्ये भरती केले गेले. त्यानंतर ते व्हेंटिलेटरवर होते. पुढे सप्टेंबर महिन्यात त्यांचे निधन झाले.

एका मुलाखतीमध्ये अंतरा श्रीवास्तवने सांगितले की, “आयुष्य कधीच आपल्याला सांगत नाही की हा काळ तुमचा शेवटचा काळ आहे. ते १० दिवसांपासून आमच्यापासून दूर होते. माझ्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी लाफ्टर चॅम्पियनशिपची शूटिंग केली होती. ते नेहमीच कामाच्या निमित्ताने टूरवर असायचे. जेव्हा मला फोन आला की, माझ्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आहे. तेव्हा मी माझे वडील की काका यांच्यामध्ये गोंधळून गेले. जेव्हा ऑगस्टमध्ये माझ्या वडिलांना हार्ट अटॅक आला, तेव्हा मला वाटले की माझेकक काजू श्रीवास्तव यांनाच तो आला आहे. मात्र प्रत्यक्षात माझ्या वडिलांना एम्समध्ये ऍडमिट केले होते. त्या दिवशी माझ्या काकांचे देखील ऑपरेशन होणार होते. काका ऍडमिट असल्यामुळे माझे वडील त्यांना हॉस्पिटलमध्ये सतत पाहायला जायचे. तर मला वाटले की काकांनाच बरे नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Antara Srivastava (@antarasrivastava)

राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबात त्यांच्या पत्नी शिखा, मुलगी अंतरा आणि मुलगा आयुष्मान हे तीन जणं आहेत. राजू यांनी १९८० साली त्यांचे करियर चालू केले होते. २००५ साली ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ हा स्टॅन्ड अप कॉमेडी रियालिटी शोमध्ये शभंग घेतल्यानंतर त्यांना नावलौकिक मिळाला. त्यांनी ‘मैने प्यार किया’, ‘बाजीगर’ आदी चित्रपटांमध्ये काम केले होते. राजू यांनी शेवटचे कॉमेडी सीरीज असलेल्या हॉस्टल डेजच्या तिसऱ्या सीजनमध्ये काम केले होते.

दरम्यान राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतरा ही एक सहायक दिग्दर्शक असून त्यांचा मुलगा आयुष्यमान हा एक सितार वादक आहे. तो कैलास खेर यांच्या बॅण्डमध्ये काम करतो.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘आपल्या मुलांना मोठे होताना पाहणे…’ रवीना टंडनने लिहिली मुलगी राशासाठी खास पोस्ट

चार दिन की चांदनी! गौतमी पाटीलवर मेघा घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘सगळ्या मर्यादा…’

हे देखील वाचा