‘बिग बॉस ओटीटी’ या शोमध्ये बऱ्याच वाद- विवादानंतर खूप प्रेम पाहायला मिळालं आहे. खरं तर, एका टास्कच्या अंतर्गत, मुलांना त्यांच्या संबंधांसह त्यांचे नाते मजबूत करायचे होते आणि त्यांची खूप काळजी घ्यायची होती. मुले त्यांच्या सहकारी स्पर्धकांचा मेकअप करतानाही दिसले. या दरम्यान, शोमधील सर्वात रोमँटिक जोडी शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्यामधील सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळाली.
राकेशने केवळ शमिताच्या पायाची मसाज केला नाही, तर तिच्या मानेवर एक सुंदर टॅट्यूही बनवला. राकेश एवढ्यावरच थांबला नाही, तर, त्याने शमिताच्या खांद्याचा आणि पाठीचाही मसाज केला. हा टास्क या जोडीच्या विशेष डान्सने संपला. इथेही शमिता आणि राकेशने आपल्या डान्सने लोकांना वेड लावले. ‘इश्क वाला लव्ह’ या गाण्यात तिच्या रोमँटिक डान्सने लोकांची मने जिंकली.
शमिताने काही वेळापूर्वी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यावर ३० हजारांहून अधिक लाईक्स आल्या आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांना असे वाटू लागले की, शमिता आणि राकेश यांच्यामध्ये प्रेम खुलायला लागले आहे.
लोकांना त्यांची केमिस्ट्री प्रचंड आवडत आहे. एकदा शोमध्ये शमिता कुठल्यातरी गोष्टीवर रडताना दिसली, तेव्हा राकेशने तिला प्रेमाने मिठी मारली आणि तिला शांत केले. दोघेदेखील शोमध्ये एकमेकांना सपोर्ट करताना दिसत आहेत
यशराज फिल्म्सच्या आदित्य चोप्राने दिग्दर्शित केलेल्या ‘मोहब्बतें’ हा शमिताचा पहिला चित्रपट होता. ‘इशिका’ या तिच्या पात्रासाठी तिला तिच्या सहकलाकार किम शर्मा आणि प्रीती झांगियानीसाठी आयफाचा सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कार मिळाला होता. ‘मेरे यार की शादी है’ आणि ‘साथिया’ या चित्रपटामधील तिच्या आयटम साँगला देखील खूप पसंती मिळाली होती. तिने ‘फरेब’ या चित्रपटातही काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-एकदम कडक! डान्सर आर सी उपाध्यायचे ठुमके पाहून तुम्हालाही येईल सपना चौधरीची आठवण
-काय सांगता! समंथा अक्किनेनी अन् नागा चैतन्यच्या नात्यात दुरावा? अभिनेत्रीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया