भोजपुरी स्टार राकेश मिश्रा त्याच्या अभिनयासोबतच गाण्यांसाठीही प्रसिद्ध आहे. त्याचे कोणतही नवीन गाणे प्रदर्शित होताच, ते सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते. अलीकडेच त्याचे प्रदर्शित झालेले ‘ए राजा जाई ना बहरिया’ हे गाणे चार्टबस्टर ठरले. या गाण्याला देखील त्याच्या चाहत्यांनी भरभरून प्रेम व प्रतिसाद दिला आहे. नुकतच राकेश मिश्राचे ‘भेट होई स्कूल पे’ हे नवीन गाणे लॉन्च झाले आहे. चाहत्यांना हे गाणे खूप आवडत आहे. गाण्याची खास गोष्ट म्हणजे पाहणाऱ्याला शाळेच्या दिवसातील प्रेम आठवेल. राकेश मिश्रा या गाण्यात शाळकरी मुलाच्या भूमिकेत दिसत आहे. ज्यात तो त्याच्या वर्गमैत्रिणीच्या प्रेमात पडतो.
राकेश ३ मिनिटे ५२ सेकंदांच्या या व्हिडिओ सॉंगमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने रोमान्स करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये त्याने शाळेतील प्रेमाचे वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामध्ये तो त्याच्या वर्गमैत्रिणीच्या प्रेमात पडतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमचे पहिले प्रेम नक्कीच आठवेल.
राकेशचा नवा म्युझिक अल्बम अतिशय सुंदर लोकेशनवर शूट करण्यात आला आहे. ‘भेट होई स्कूल पे’ हे गाणे राकेशने पुनीता प्रियासोबत गायले आहे. या गाण्याचे बोल गौतम सिंग यांनी लिहिले असून, संगीत रविराज देवाने दिले आहे. या भोजपुरी म्युझिक अल्बमचे व्हिडिओ डायरेक्टर रणजीत कुमार असून आरएमपी म्युझिकने ११ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित केले आहे.
राकेशच्या फिल्म प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले, तर त्याने नुकतेच एका भोजपुरी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात तो शुभी शर्मासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. मात्र, निर्मात्यांनी अद्याप या चित्रपटाच्या शीर्षकाचा खुलासा केलेला नाही. यापूर्वी, अभिनेता ‘दुष्मन सरहद पर के’, ‘स्पेशल एन्काउंटर’, ‘राधे रंगीला’, ‘हरी ओम हरी’ आणि ‘रानी की आयेगी बारात’ सारख्या अनेक लोकप्रिय भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-पॅपराजीने पोझ द्यायला सांगताच भडकला रणबीर कपूर, रागाच्या भरात म्हणाला…
-राजकुमार अन् पत्रलेखाच्या मेहंदी सोहळ्यात पोहोचली हुमा कुरेशी, जोडपे आज अडकेल रेशीमगाठीत