Saturday, June 29, 2024

पतीच्या ‘या’ सवयीला कंटाळलीये राखी सावंत, म्हणाली ‘हे जर असंच चालू राहिलं तर…’

ड्रामा क्विन राखी सावंत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी पतीबद्दल तर कधी सलमान खानबद्दल ती बोलताना दिसते. तिच्या या चर्चेत राहण्याच्या सवयीमुळे अनेकदा वादही निर्माण झालेले पाहायला मिळतात. आता राखीने आपल्या पतीबद्दल केलेल्या वक्तव्याने ती पून्हा एकदा सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे.

‘बिग बॉस १५’ चा नुकताच निकालही लागला. याआधीच घरातून बाहेर आलेल्या राखी सावंतने आपल्याला बाहेर काढल्याचा राग व्यक्त केला आहे. तशी तर ती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. सध्या ती पती रितेश कुमारसोबत फिरताना दिसत आहे. मात्र आता एका व्हिडिओमध्ये राखी आपल्या पतीची तक्रार करताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये राखी सावंत आपल्या पतीसोबत माध्यमांसमोर बोलताना दिसत आहे. यावेळी बोलता बोलता ती त्याच्या गालाला हात लावते त्यावेळी रितेश कुमार लाजतो. याच दरम्यान समोर उभा असलेल्या विशालने त्यांची फिरकी घेताना मी पहिल्यांदा अशी जोडी पाहतोय ज्यामध्ये पतीचं लाजताना दिसतोय अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी विशालला उत्तर देताना “हा नेहमी असाच लाजत असतो. या सवयीने मी कंटाळली आहे,” अशी तक्रारही राखीने केली आहे. याबद्दल पुढे बोलताना राखीने “असंच चालू राहिले, तर आमची सुहागरात होइल की नाही याबद्दलही शंका आहे,” असेही म्हटले आहे. “असाच लाजत बसला तर मला जाईल दुसरेच कोणीतरी घेउन तेव्हा मात्र मला काही बोलू नकोस,” अशी धमकीही तिने यावेळी दिली आहे. राखीच्या या बिंधास्त वक्तव्याने सगळेजण हसताना दिसत आहेत. याआधी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर राखी आपल्या पतीसोबत कॅमेऱ्यापुढेच लिपलॉक करतानाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता.

नेहमी बिग बॉस कार्यक्रमाचं कौतुक करणारी राखी यावेळी प्रचंड संतापलेली दिसत आहे. “मला नेहमी कार्यक्रमात बोलावून मनोरंजनासाठी माझा वापर केला जातो, नंतर मला टिशु पेपरसारखं बाहेर फेकले जाते,” असा थेट आरोप तिने केला आहे. सध्या राखीच्या या व्हिडिओची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा