Friday, July 5, 2024

ब्रेकिंग! राखी सावंतला झाली अटक ‘या’ अभिनेत्रीने ट्विट शेअर करत केला दावा

‘ड्राम क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी प्रसदिद्ध अभिनेत्री राखी सावंत सतत आपल्या बेधडक वक्तव्यामुळे आणि फॅशनमुळे  ओळखली जाते. काही दिवसांपूर्वी म्हणजेच 2022 मधील अभिनेत्री शर्लिन चोपडा हिने राखी विरोधात एका प्रेस कॉन्फ्रंसला तिचा अश्लील व्हिडिओ दाखवत आणि अभद्र भाषेचा वापर केल्याचा आरोप करत राखीविरोधात तक्रार नोंदवली आहे. नुकतंच बातमी समोर येत आहे की, राखीला आंबोली पोलिसांनी अटक केली आहे. याची बातमी स्वत: शर्लिनने ट्वीट शेअर करत दिली आहे.

अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) नुकतंच तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानी (Adil Durrani) सोबत लग्न केल्यामुळे खूपच चर्चेत होती. आज दुपारी 3 वाजता तिच्या पतीसोबत डान्स अकॅडमी लॉन्च करण्यासाठी जाणार होती अशात अभिनेत्रीला शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) या प्रकरणात अंबोली पोलिसांनी तिला अटक केली आहे.

शर्लिनने देखिल तिच्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरुन ट्वीट शेअर करत लिहिले की, “ताजी बातमी!!! आंबोली पोलिसांनी FIR 883/2022 प्रकरणी राखी सावंतला अटक केली आहे. काल राखी सावंतचा ABA 1870/2022 मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला.” असं ट्वीट शेअर करत तिने हा बातमी सर्वत्र पसरवली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
स्वप्नील जोशीने ‘वेड’च्या यशानंतर रितेश, जिनिलियाचे ट्विट करत केले अभिनंदन, मात्र झाला ट्रोल
ऐश्वर्या रायने आकार दिलेले सिनेमामुळे करिश्मा कपूर झाली सुपरस्टार, जाणून घ्या त्या सिनेमाबद्दल

हे देखील वाचा