Monday, February 2, 2026
Home टेलिव्हिजन राखी सावंतने दुबईमध्ये घर घेत सुरु केली अकॅडमी, आनंदाची बातमी सांगताना आदिलच्या आठवणीने कोसळले रडू, व्हिडिओ व्हायरल

राखी सावंतने दुबईमध्ये घर घेत सुरु केली अकॅडमी, आनंदाची बातमी सांगताना आदिलच्या आठवणीने कोसळले रडू, व्हिडिओ व्हायरल

मनोरंजनविश्वातील ड्रामा क्वीन अशी ओळख असलेली राखी सावंत तिच्या आदिल खानसोबत झालेल्या लग्नानंतर सतत चर्चेत आहे. रोज तिच्या लग्नाशी संबंधित माहिती मीडियामध्ये येत असते. मात्र आता तिने मुव्ह ऑन करत तिचे आयुष्य पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. तिने दुबईमध्ये नुकतीच एक अभिनयाची प्रशिक्षण संस्था उघडली असून, एक नवीन घर आणि कार देखील घेतली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

काही दिवस दुबईमध्ये असलेली राखी नुकतीच भारतात परतली आहे. मागच्या महिन्यात तिने दुबईमध्ये ऍक्टिंग अकॅडमी ओपन केली. त्यानंतर ती मार्चमध्ये परत भारतात आली. तिला एयरपोर्टवर स्पॉट केले गेले. पापराजीना पाहून राखी त्यांच्याशी बोलत होती. ती म्हणाली, “मी दुबईमध्ये माझी अकॅडमी सुरू केली असून, सोबतच तिथे एक घर आणि गाडीही घेतली आहे,” ती बोलत असतानाच लगेच पुढच्याच क्षणी ती अचानक रडू लागली आणि म्हणाली, “ही तीच जागा आहे ना, जेव्हा मी आदिलबरोबर इथे आले होते. मी आणि आदिल दुबईवरून परत आलो होतो, तेव्हा इथेच फुलांचा वर्षाव करण्यात आला होता. पण, त्याने ते सर्व नाटक असल्याचे त्याच्या गर्लफ्रेंडला सांगितले होते,” हे बोलताना ती रडत होती.

यावेळी तिने तिच्या आईला देखील मिस केले. ती म्हणाली, “मागच्या वेळेस मी माझ्या आईला दुबईला घेऊन गेले होते. मात्र आता ती सोबत नाही. पुढे ती लोकांना होळीच्या शुभेच्छा देताना म्हणाली, “सर्वांना होळीच्या शुभेच्छा माझ्या आयुष्यातून तर रंग गेले आहेत, मात्र तुम्ही सर्व आनंदी राहा. होळीचे रंग तुमच्या घरात सतत राहो. आनंदी राहा. होळी मुबारक.” मधल्या काही दिवसांमध्ये राखीने अदिलवर धोका दिल्याचा आणि मारहाण केल्याचा आरोप लावला होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या तो म्हैसूर जेलमध्ये आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
Womens Day Special: आधुनिक विचाराच्या क्षेत्रात राहूनही ‘या’ अभिनेत्री ठरल्या घरगुती हिंसाचाराच्या बळी  

हाेळीच्या रंगात रंगली श्वेता शिंदे

हे देखील वाचा