राखी सावंत नेहमीच या ना त्या कारणामुळे मीडियामध्ये गाजत आहे. कधी तिचे वैयक्तिक आयुष्य तर कधी तिचे व्यावसायिक आयुष्य राखी नेहमीच थोड्याच भरपूर सांगत मीडियाचे लक्ष वेधून घेत प्रसिद्धी मिळवत असते. आता पुन्हा एकदा राखी चर्चेत आली आहे. मात्र यावेळेला मीडियामध्ये गाजण्याचे कारण राखीचा भाऊ आहे. राखीचा भाऊ असलेल्या राकेश सावंतला पोलिसांनी अटक केली आहे.
राकेश सावंतला एका व्यावसायिकाच्या तक्रारीवरून अटक करण्यात आली आहे. हा वाद तीन वर्षांपूर्वीचा आहे. चेक बाउंस झाल्याच्या प्रकरणात राकेशला पोलिसांनी अटक केली आहे. राकेशला २२ मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याआधी देखील त्याला कोर्टात नेले गेले होते. तेव्हा त्याला पैसे परत देण्याच्या अटीवरून त्याला सोडण्यात आले होते. मात्र त्याने पैसे दिले नाही. म्हणून आता त्याला पुन्हा अटक झाली आहे. यावर अजून राखीची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-