लोकप्रिय शो ‘बिग बॉस १५’मध्ये सतत धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. नुकतेच, घरातील स्पर्धक सिम्बा नागपालला बीबी हाऊसमधून बाहेर काढण्यात आले आहे, तर तीन नवीन सदस्यांना घरामध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्यात करण्यात आली आहे.
दरम्यान, बिग बॉसमध्ये आणखी एक धमाकेदार अभिनेत्री एन्ट्री होणार असल्याची बातमी आहे. ही अभिनेत्री याआधीही बिग बॉसच्या घरात दिसली आहे. इतकंच नाही तर या अभिनेत्रीने स्वतःहून संपूर्ण शोचा टीआरपी वाढवला आहे. अनेक वैशिष्ट्यांसह, आम्ही कोणाबद्दल बोलत आहोत हे तुम्हाला समजले असेलच. (rakhi sawant can enter in salman khan show bigg boss 15 as wild card)
आम्ही बोलत आहोत, इंडस्ट्रीतील ड्रामा क्वीन राखी सावंतबद्दल. ‘बिग बॉस’बद्दल अत्यंत अचूक माहिती देणाऱ्या एका वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार, राखी सावंत लवकरच ‘बिग बॉस १५’ मध्ये प्रवेश करणार आहे. मात्र, निर्मात्यांकडून अशी कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण ही बातमी खरी असेल आणि राखी शोमध्ये आली तर कुठेतरी शोच्या टीआरपीला त्याचा फायदा होईल.
राखी ‘बिग बॉस’च्या १४ व्या सीझनमध्ये दिसली होती. तिने शो मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री केली होती, परंतु तिच्या एन्ट्रीनंतर शोचा टीआरपी जबरदस्त वाढला होता. कधी ज्युली बनून, तर कधी अभिनव शुक्लाची छेड काढून राखीने घरात धुमाकूळ घातला होता. मात्र, अभिनेत्री शो जिंकू शकली नाही आणि १४ लाख रुपये घेऊन बाहेर पडली. पण राखीला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळाले. अशा परिस्थितीत राखीचे ‘बिग बॉस’मध्ये परतणे तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी असेल. यावेळी राखी घरात काय कारनामे करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे!
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-युविका चौधरीच्या अगोदर ‘या’ सुंदऱ्यांसोबत जोडलं गेलंय प्रिन्सचं नाव, नोरा फतेहीचाही आहे समावेश
-भररस्त्यात पती रोहनप्रीतसोबत रोमान्स करताना दिसली नेहा कक्कर, गायिकेचे ‘लिप-लॉक’ फोटो आले समोर
-‘या’ अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोरच उघडली शर्टची बटणं आणि पँटची झिप, व्हायरल होतंय बोल्ड फोटोशूट










