‘ड्राम क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंत नुकतंच बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यानंतर राखीने तिची आईबद्दल एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती खूप रडत होती आणि तिने तिच्या आईला ब्रेनट्युमर आजार आहे असं सांगितले होतं, आणि अशातच कालपासून तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते आहेत.
अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) तिने तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानी (Adil Khan Durrani) याच्या सोबत गळ्यात हार घार घालून आणि हातामध्ये मॅरेज सर्टिफिकेट घेऊन सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. त्यावेळा राखीने पारंपारिक पद्धातीचे कपडे परिधान केले होते आणि आदिलने फॉर्मल शर्ट, पॅन्ट परिधान केला होता. तर एका फोटोमध्ये दोघेही हातामध्य मॅरेज सर्टिफिकेट घेऊन दिसले होते. मात्र अनेकांनी या लग्नाला खोटं म्हणलं आहे.
View this post on Instagram
राखीने शेअर केलेल्या मॅरेज सर्टिफिकेटवर तारीख (दि, 29 मे 2022) लिहिलेली आहे, याचा अर्थ असा की या दोघांनी मागच्यावर्षीच लग्न केलं आहे. फोटो व्हायरल जाल्यानंतर अनेकांनी कमेंटचा वर्षाव केला असून निव्वळ अफवा असं म्हटलं आहे. मात्र, राखीने प्रेक्षकांच्या प्रश्नावर मौन सोडले आहे. तर राखीने आपल्या अधिकृत इस्टाग्राम अकाउंटवरुन काही फोट शेअर करत आदिल बरोबरच्या लग्नाला कबुली दिली आहे. फोटोला कॅप्शन देत राखी म्हाणाली की, “मी खूप खुश आहे, मी लग्न केलं आहे. माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे आदिल.”
View this post on Instagram
राखीने फोटोंशिवाय एक व्हिडिओ देखिल शेअर केला आहे ज्यामध्ये ते दोघे एकमेकांना वरमाळा घालताना दिसून येत आहे. काहींनी राखीच्या लग्नाला शुभेच्छा दिल्या आहे तर काहीजन राखीला ट्रोल करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘आई कुठे काय करते’ मालिकेला तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मिलिंद गवळी यांनी शेअर केली भावनिक पोस्ट
‘हा पृष्ठभाग बघून…’ प्रसाद खांडेकरने पोस्ट शेअर करत दिला शाळेच्या ‘त्या’ सुंदर आठवणींना उजाळा