मनोरंजनविश्वातील ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या राखी सावंतच्या आयुष्यात सध्या मोठा ड्रामा घडत आहे. आदिल खानसोबत लग्न केल्यानंतर तिच्या आयुष्यात आलेले वादळ थांबण्याचे नावच घेत नसून एकापाठोपाठ एक संकटांची मालिका तिच्या आयुष्यात चालू झाली आहे. एकीकडे तिच्या आईचे निधन झाले तर दुसरीकडे तिचा नवरा अविश्वासू निघाला. सध्या राखीवर दुःखांचा डोंगर कोसळला असून, ती यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. राखीने आदिल विरोधात केलेल्या केसनंतर त्याला पोलिसांनी अटक केली असून, तो सध्या कस्टडीमध्ये आहे. राखी आणि आदिलच्या या भांडणांमध्ये आता शर्लिन चोप्राने उडी मारली आहे.
काही दिवसांपूर्वी राखी सावंतने आदिल खानचे काही फोटो समोर आणत त्याचा खरा चेहरा सर्वांना दाखवला. सोबतच तिने आदिलवर मारहाण करण्याचा आणि पैसे चोरण्याचा गंभीर आरोप देखील लावला. राखीने त्याच्या विरोधात केलेल्या पोलीस तक्रारीनंतर आता त्याला अटक झाली असून, यावर अभिनेत्री शर्लिन चोप्राने तिचे मत व्यक्त केले आहे. मीडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये शर्लिनने आदिलच्या बाजूने तिचे मत व्यक्त केले आहे.
View this post on Instagram
शर्लिन चोप्राने राखी आणि आदिल यांच्या वादावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “माझा भाऊ आदिल खूपच हुशार आणि विचारी माणूस आहे. मी आदिलसोबत पोलीस स्टेशनमध्ये काही काळ घालवल्यानंतर हे सांगू शकते की तो खुप चांगला माणूस आहे. माहित नाही तो या पूर्ण वादात कसा काय अडकला. मी त्याला त्याच्या तोंडावर म्हणाली, तू एवढा विचारी माणूस वाटतो तू कुठून कुठे आलास. कसा काय अडकला तू या प्रकरणात? प्रसिद्धीसाठी एकमेकांशी भांडणे आणि नात्याचा मजाक बनवणे आवश्यक नाही.”
पुढे ती म्हणाली, “मी राखीच्या नवऱ्याला आदिलला माझा भाऊ मानले आहे. राखीबद्दल ऐकून अजिबातच चांगले वाटत नाही. कसेही काहीही असो अशा करते की दोघांमध्ये सर्व काही ठीक व्हावे. जर अदिलची चूक असेल तर त्याने मान्य करावी नसेल तर हा गैरसमज का आणि कोणामुळे निर्माण झाला हे शोधावे.” तत्पूर्वी राखी आणि शर्लिन या दोघींमध्ये मोठा वाद आहे. अनेकदा त्या एकमेकींवर आरोप करताना दिसतात.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
काली काली जुल्फों के …! रिधीमा पंडीतची घायाळ करणारी अदा, पाहाच फोटो गॅलरी
अनुपम खेर यांनी ट्विट करत ‘या’ सुपरहिट सिनेमाच्या सिक्वलची केली मागणी, अक्षय कुमारने देखील दिला दुजोरा