Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘मी ३ दिवसांपासून मी कॉफी नाही पिली, माझी कॉफी दे पटकन’, राखी सावंतचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूडमधील ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या प्रेक्षकांच्या चर्चेत असते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट असो किंवा तिचे वैयक्तिक आयुष्य असो ती चाहत्यांना नेहमीच सगळ्या गोष्टीची माहिती देत असते. त्यात तिचा मजेशीर अंदाज तर प्रेक्षकांना खूपच आवडतो. अशातच राखीचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही हसून हसून लोटपोट व्हाल.

वुम्पलाने राखीचा हा व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, राखी एका कॉफी शॉपमध्ये आलेली आहे. तिथेच पॅपराजी आणि तिचे काही चाहते उपस्थित होते. तेव्हा तिच्या एका चाहता लांबून तिच्यासोबत सेल्फी काढताना दिसत आहे. राखी सावंत त्याला सेल्फी देते आणि म्हणते की, “लांबून सेल्फी घ्या. मी लांबूनच सुंदर दिसते. लांबून मला बघाल तर मी ऐश्वर्या राय दिसते,पण जवळ येऊन बघाल तर मी राखी सावंत दिसते.” यावर पॅपराजी जोरजोराने हसायला लागतात.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, राखीने लाल रंगाचा शॉर्ट ड्रेस घातलाय. मास्क तोंडाला लावायच्या ऐवजी तिने हा मास्क तिच्या हातात धरला आहे.

यावेळी पॅपराजी म्हणतात कि, राखी मॅम इकडे बघता का दोन मिनिट. यावर ती दुर्लक्ष करून म्हणते की, “मी कॉफी प्यायला आले आहे. 3 दिवसापासून मी कॉफी नाही पिली. मला खूप रडायला येत आहे.”

त्यानंतर पुढच्या एका व्हिडिओमध्ये ती म्हणते की, “पाऊस येतोय. माझी कॉफी दे पटकन. मी उडून जाईल.” राखी सावंतचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओ सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे.

राखी सावंतच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक हिंदी, तमिळ, तेलुगु आणि मराठी चित्रपटात काम केले आहे. तिने अभिनया सोबत मॉडेलिंग आणि डान्स देखील करते. ती शेवटची बिग बॉस 14 मध्ये दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘जीना नहीं मुझे हैं मरना’, म्हणत छतावर केला कुणाल खेमूने डान्स, मजेशीर व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट

-खुशी कपूर झाली घराबाहेर स्पॉट अन् सगळीकडे होऊ लागली तिच्या वॉलपेपरची चर्चा, पाहून तुम्हीही व्हाल भावुक

-दगडाने संगीत वाजवत मुलाने ट्रेनमध्ये गायलं अरिजित सिंगचं गाणं; पाहा मन जिंकणारा व्हिडिओ

हे देखील वाचा