Tuesday, July 9, 2024

जेव्हा राखी सावंतला रस्त्यावर थांबवून ‘असे’ कृत्य करू लागली एक व्यक्ती, पाहून अभिनेत्रीही झाली अवाक्

ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) आपल्या सोशल मीडियावरील अंतरंगी पोस्टमुळे आणि व्हिडिओमुळे नेहमीच चर्चेत असते. ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर व्हायरल होत असते. आताही राखीचा एक भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये राखी सावंत आणि एक फुगेवाला यांची जुगलबंदी पाहायला मिळत आहे.

राखी सावंत तिच्या बिनधास्त आणि बोल्ड स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. अगदी पॅपाराझींनाही राखी सावंतचा प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करायचा असतो. सध्या राखीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती जिमच्या कपड्यांमध्ये नेल पार्लरमधून बाहेर पडताना पाहताच एका व्यक्तीने विचित्र वागायला सुरुवात केल्याचे दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये राखी सावंतने फिकट जांभळ्या रंगाचे जिमचे कपडे घातलेले दिसत आहेत. राखी नेल पार्लरजवळ उभ्या असलेल्या तिच्या लाल कारच्या दिशेने येताच तिला एका फुगेवाल्याने थांबवले. हा फुगेवाला राखी सावंतला थांबवतो आणि थेट चित्रपटाचे डायलॉग म्हणू लागतो. “मी शक्ती कपूर बनत आहे.” असे म्हणत हा फुगेवाला डायलॉग बोलताना दिसत आहे.

हे पाहून राखी सावंत पॅपराझींना ‘काय करतोय हा भाऊ’ म्हणत दुर्लक्ष करते. मात्र या व्यक्तीने राखी सावंतसमोर आणखी एका चित्रपटाचा डायलॉग मारला. यानंतर राखी गाडीत बसायला निघते. सध्या हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे. याआधी राखी सावंतचा असाच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता, व्हिडिओमध्ये राखी सावंत शिमरी थाई हाय स्लिट ड्रेसमध्ये दिसली होती. त्यामुळेच ती जोरदार चर्चेत आली होती. कारण काही दिवसांपूर्वी अनन्या पांडेही असाच ब्लॅक कलरचा ड्रेस परिधान करताना दिसली होती. विशेष म्हणजे या दोघांच्या ड्रेसमध्ये फक्त रंगाचा फरक दिसत होता, बाकीचा ड्रेस राखीने हुबेहुब कॉपी केला होता. त्यामुळे तिला जोरदार ट्रोल करण्यात आले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा