Monday, June 23, 2025
Home बॉलीवूड म्हणून राखी सावंतचे पित्त खवळले, थेट हातात फावडे घेऊन रिक्षाच्या मागे सुटली पळत

म्हणून राखी सावंतचे पित्त खवळले, थेट हातात फावडे घेऊन रिक्षाच्या मागे सुटली पळत

सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे प्रसिद्धी पिपासू अभिनेत्री राखी सावंत चर्चेचा विषय ठरत असते. कधी ती पॅपराजींसोबत चर्चा करताना दिसते, तर कधी ती वेगवेगळ्या मुद्द्यांवर तिचे मत मांडताना दिसते. यंदा मात्र तिचे वेगळेच रूप पाहायला मिळाले आहे. यावेळी असे काय झाले की, तिला इतका राग आला आहे. चला तर जाणून घेऊया…

राखी सावंतचा व्हिडिओ होतोय व्हायरल
आपल्या बोल्ड अदा आणि हसतमुख व्यक्तिमत्वामूळे राखी सावंत (Rakhi Sawant) हिने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी राखीला इतका राग आला की, ती फावडे घेऊन रस्त्यावर रिक्षाच्या मागे पळू लागली. आतापर्यंत खदखदून हसवणाऱ्या राखीला पाहून तिच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. राखी अचानक एवढी नाराज का झाली की, तिला असे काहीतरी करावे लागले? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

जिमच्या बाहेरील दृश्य पाहून रागावली राखी
मागील काही दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस होत आहे. यामुळे काही ठिकाणी झाडे पडली, तर कुठे घाणीचं साम्राज्य पसरलं आहे. जिममधून बाहेर येताना जेव्हा राखीने हे सर्व पाहिलं, तेव्हा तिला हे सगळं पाहावलं गेलं नाही. ती हातात फावडा घेऊन इकडे तिकडे पाहू लागली. जेव्हा लोक तिच्याकडे थांबून पाहू लागले, तेव्हा तिला अजून राग आला आणि ती थांबलेल्या एका रिक्षामागे हातात फावडे घेऊन पळू लागली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

राखी दिसली, पण आदिल गायब
आजकाल राखी जिथेही जाते, तिच्या सोबत तिचा बॉयफ्रेंड आदिल दिसतोच. परंतु या व्हिडिओमध्ये आदिल दिसत नाहीये. आदिलसोबत राखीची प्रेम कहाणी कशी सुरू झाली, हे तर ठाऊक नाही, पण लवकरच दोघेही लग्न करणार असल्याची चर्चा आहे. राखीला चाहत्यांचे लक्ष कसे वेधून घ्यायचे हे चांगलेच माहिती आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात आरोपी क्षितिज प्रसादची विनवणी; म्हणाला, ‘मला निर्दोष सोडा, मी कधीच…’

बापरे! उर्फी जावेदची मस्ती आली अंगलट, रक्ताने माखले मित्राचे कपाळ

काय सांगता! कार्तिक आर्यननंतर आता ‘या’ साऊथ अभिनेत्याला डेट करू इच्छिते सारा अली खान

हे देखील वाचा