Monday, June 9, 2025
Home टेलिव्हिजन आईच्या निधनानंतर ‘भाईजान’च्या नावाने राखीनं फोडला हंबरडा, सलमानचं नाव घेत ढसाढसा रडली अभिनेत्री

आईच्या निधनानंतर ‘भाईजान’च्या नावाने राखीनं फोडला हंबरडा, सलमानचं नाव घेत ढसाढसा रडली अभिनेत्री

बिग बॉस फेम प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंत हिची जया सावंत यांचे (दि, 28 जानेवारी) रोजी निधन झाले आहे. त्या दीर्घकाळापासून ब्रेन ट्युमर आणि कर्करोगाने त्रस्त होत्या. त्यांच्यावर टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. राखीचा पती आदिल दुर्रानी याने जया यांच्या मृत्यूची माहिती दिली. आईच्या निधनामुळे राखी खूप खचली आहे अशातच तिच्या आईला रुग्णालयात घेऊन जात असताना राखीने सलमान खानचीही आठवण काढली आहे.

ड्र्मा क्वीन म्हणून प्रसिद्धी झोतात असेल राखी सावंत (Rakhi Sawant) हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे, अनेक दिवसांपासून कॅन्सर आणि ब्रेन ट्युमर सारख्याआजाराशी झगडत असणाऱ्या राखीची आई जया सावंत (Jaya Sawant) यांनी अखेरचा श्वावस घेतला आहे त्यामुळे राखी खूपच हळहळली आहे. राखीच्या आईची तेब्येत दिवसागणिक वाढतच चालली होती त्यामुळे तिने चांगल्या चांगल्या डॉक्टरांकडून त्यांचा इलाज करुन घेताल मात्र, शेवटी त्यांनी जगाला राम राम ठोकला. आईच्या निधनानंतर राखीला मोठा धक्का बसला आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राखीने सलमान खानची आठवण काढली आहे. व्हिडिओमध्ये राखी रुग्णालायात जाताना दिसून येत असूनन ढसाढसा रडत आहे त्यावेळी ती “सलमान भाई मां मर गई.” असं म्हणत जोरजोरात अश्रू ढाळू लागली. असं म्हणत सारखं सलमानचं नाव घेत रडू लागली.

 

View this post on Instagram

 

राखी सावंतच्या आईला गेल्या 3 वर्षापासून कॅन्सरसाख्या घातक आजाराने वेढलं होतं, याच्यावर उपचारही घेत होत्या मात्र, वाढत्या वयामुळे त्यांचा आजार वाढतच गेला. त्यामुळे त्यांची किडणी आणि फुफ्फुसांमद्ये देखिल कॅन्सर पसरला होता. तिच्या आईचे मल्टीपल ऑर्गन फेल झाले होत, ज्यामुळे त्यांची तब्येत अजूनच बिघडली होती. राखीच्या मते तिच्या आईला ब्रेन ट्युमरही झाला होता ,ज्यामुळे त्या कोणालाही ओळखू शकत नव्हत्या. राखीला पैशांची गरज होती त्यामुळे सलमान खान पासून ते मुकेश अंबानी सारख्या लोकांची राखी सावंतची मदत केली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

सनशाइन! रिया चक्रवर्तीचा कातिलाना अंदाज, पाहाच फोटो गॅलरी
आजभी सादगी से सुंदर कोई फॅशन नाही| सुरभी ज्येतीचं लेटेस्ट फोटोशूट

हे देखील वाचा