Saturday, June 29, 2024

राखीवर कोसळलाय दु:खाचा डोंगर! काही दिवसांपूर्वीच वडीलांच निधन आणि आता आई…, वाचा राखीच्या कुटुंबियांविषयी

बिग बॉस फेम प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंत हिची आई जया सावंत यांचे (दि, 28 जानेवारी) रोजी निधन झाले आहे. त्या दीर्घकाळापासून ब्रेन ट्युमर आणि कर्करोगाने त्रस्त होत्या. त्यांच्यावर टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. राखीचा पती आदिल दुर्रानी याने जया यांच्या मृत्यूची माहिती दिली. आईच्या निधनामुळे राखी खूप खचली आहे. सोशल मीडियावर राखी रडतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसून येत आहे.

ड्र्मा क्वीन म्हणून प्रसिद्धी झोतात असेल राखी सावंत (Rakhi Sawant) हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे, अनेक दिवसांपासून कॅन्सर आणि ब्रेन ट्युमर सारख्याआजाराशी झगडत असणाऱ्या राखीची आई जया सावंत (Jaya Sawant) यांनी अखेरचा श्वावस घेतला आहे. त्यापूर्वी 2015 साली त्यांचं कॅन्सरचं ऑफरेशमन झालं होतं. तर 2021 साली देखिल त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया झाली होती. त्यावेळी सलमान खान  (Salman Khan) आणि सोहेल खान (Sohel Khan) यांनीच राखीची मदत केली होती. मात्र, जयाजींंच्या निधनामुळे राखी कोलमडून गेली आहे.

सगळ्यांना राखीच्या आई बद्दल तर माहीतच असेल मात्र, तिच्या वडीलंबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. राखी सावंतची आई जया सवंत यांनी दुसरं लग्न आनंद सावंत यांच्याशी केलं होतं. ते मुंबई पोलिस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. राखी तिच्या नावापुढे त्यांचच आडनाव लावत असते मात्र, राखीचा आणि तिच्या वडीलांचा एकत्र एकही फोटो पाहायला मिळाला नाही. 2012 साली आनंद सावंत यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आणि आता राखीच्या आईचे निधन झाले आहे त्यामुळे अभिनेत्रीवर दु:खाचं डोंगर कोसळलं आहे.

 

View this post on Instagram

 

माध्यमातील मिडिया रिपोर्टनुसार राकेश सावंत (Rakesh Sawant) नावाचा राखीचा एक लाहन भाऊ देखिल आहे तर उषा सावंत (Usha Sawant) नावाची एक छोटी बाहीनही आहे. मात्र, राखीने आजपर्यत यांच्याबद्दल काही सांगितलही नाही आणि त्यांच्यासोबत कधी दिसली देखिल नाही. 2019 साली राखीने एनआरआय रितेश सोबत लग्न केलं होतं त्याशिवाय त्या दोघांनी बिग बॉस 15 (Bigg Boss 15) मध्येही भाग घेतला होता. त्या कार्यक्रमातच त्यांच्यामध्ये वादाला सुरुवात झाली आणि 2022 साली ते वेगळे झाले. त्यानंतर राखीने आदिली दुर्रानीला (Adil Durrani) डेट कारायाल सुरुवात केली आणि 2020 च्या मे महीन्यात त्यांनी कोर्ट मॅरेज पद्धतीने लग्न केलं. राखीने त्याच्या लग्नाची बातमी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“देशामध्ये फक्त सेक्स आणि शाहरुख खानच विकला जातो”, नेहा धुपियाचं विधान चर्चेत
लाल रंगाचा टीशर्ट आणि हातामध्ये कुत्र, खूपच रंजक आहे अनुप खेर आणि नीना गुप्ता यांची लव्हस्टोरी…

हे देखील वाचा