Monday, July 1, 2024

काय सांगता! हॉलिवूडमध्ये जाण्यास राखी सावंत सज्ज, ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहत्यांनी पाडला कमेंटचा पाऊस

अभिनेत्री राखी सावंत तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्याची कोणतीही संधी कधीच सोडत नाही. मग ते मनोरंजन बिग बॉस १४ च्या माध्यमातून केले गेले असेल, किंवा आता सोशल मीडियावर तिच्या मजेदार व्हिडिओंद्वारे केलेले असेल. ती तिच्या वेगळ्या स्टाईलने प्रत्येकाचे मन जिंकते, आणि कोणाच्याही चेहऱ्यावर हास्य आणत असते. कोरोनाच्या काळात तर राखी चाहत्यांचे फारच मनोरंजन करत आहे. आजकाल राखीने हॉलिवूडमध्ये जाण्याची तयारी सुरू केली आहे. राखीचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून दिसते की, ती लवकरच हॉलिवूडमध्ये झळकणार आहे.

राखी सावंत आजकाल तिचा एडिट केलेला व्हिडिओ, सोशल मीडियावर शेअर करते आहे. या व्हिडिओमध्ये तिने रिफेस अ‍ॅप वापरुन, दुसर्‍या अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरून आपला चेहरा बदलला आहे. बॉलिवूडच्या अनेक सेलेब्सच्या व्हिडिओंद्वारे असे केल्यानंतर, आता राखीने हॉलिवूडची तयारी केली आहे. यावेळी तिने हॉलिवूड चित्रपटाच्या प्रॉमिसिंग यंग वूमन, अभिनेत्री कॅरी मुलिगनच्या व्हिडिओमध्ये आपला चेहरा बदलला आहे.

व्हिडिओ शेअर करताना राखीने लिहिले, “मी हॉलिवूडमध्ये येत आहे.” व्हिडिओमध्ये राखी वेगवेगळ्या अवतारात दिसली आहे. व्हिडिओमध्ये नर्सचा लूकही तिने दाखवला आहे. राखीचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. लाखों प्रेक्षकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

या व्हिडिओवर राखीच्या चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. एका युजरने लिहिले, “आपण हॉलिवूडमध्ये खरोखरच असायला हवे. आपला चेहरा हॉलिवूडसाठी परिपूर्ण आहे.” त्याचवेळी, इतर युजर्सना राखीचा नर्सचा अवतार आवडला आहे. त्यांनी कमेंट केली, “नर्स राखी.” तसेच हार्ट इमोजी पोस्ट केला आहे.

राखी सावंतचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती मास्कशिवाय चालणार्‍या मुलींवर रागवताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये राखी एका मुलीला सांगते की, “तुमचा मास्क कोठे आहे, तुम्ही निष्काळजीपणाने राहू नका. कोव्हिडची तिसरी लाट येणार आहे.” मग मुलगी म्हणते की, “माझा मास्क उडून गेला आहे.” राखी म्हणते, “उडून जायला ती काय चिमणी होती का?” मुली राखीचे हे बोलणे ऐकून हसू लागतात. यानंतर, राखी कोणालातरी त्या मुलीसाठी मास्क मागवते, आणि तिच्यासमोर त्या मुलीला घालते.

अलीकडे राखी सावंत म्हणाली की, सोनू सूद आणि सलमान खान, ज्याप्रकारे या कठीण काळात लोकांना मदत करत आहेत, त्यांनी पंतप्रधान व्हावे. राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-डीप नेक बोल्ड ब्लॅक ड्रेसमध्ये उर्वशी रौतेलाच्या जीवघेण्या अदा! पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

-‘तुम्ही असे उड्या मारत राहिलात तर…’, फिटनेस फ्रिक मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापटच्या व्हिडिओवर युजरची मजेदार प्रतिक्रिया

-‘तुला पाहून फ्लॅट झालो राव!’ ‘तुला पाहते रे’ फेम गायत्री दातारच्या व्हिडिओवर चाहते झाले फिदा; एकदा पाहाच

हे देखील वाचा