Wednesday, July 3, 2024

काय सांगता! मराठी बिग बॉसच्या घरात राखी सावंत होती प्रेग्नेंट? स्वतःच केला खुलासा

सध्या मीडिया आणि मनोरंजनविश्वात सर्वांच्या चर्चांमध्ये एक नाव सातत्याने येत आहे, आणि ते म्हणजे राखी सावंत. राखी सावनतने लग्न केल्याचे जाहीर केले आणि त्यानंतर तिने आणि तिचा पती असलेल्या आदिल खानने त्यांच्या लग्नावर रोज नवीन खुलासे करायला सुरुवात केली. कधी म्हणे लग्न झाले, कधी म्हणे नाही, कधी म्हणायचे लग्न झाले पण परिवाराला मान्य नाही इतर अनेक गोष्टी या लग्नावरून त्यांनी मीडियासमोर सतत सांगितल्या. त्यात आता राखीने ती प्रेग्नेंट होती असे सांगितले आहे.

सध्या राखी तिच्या आईच्या आजारपणामुळे आणि तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे सतत गाजताना दिसत आहे. यातच आता राखी प्रेग्नेंट असल्याच्या बातम्या समोर आल्या. राखीसोबत बोलायचा मीडियाने खूप प्रयत्न केला मात्र तिने बोलण्यास नकार दिला. आता सेलिब्रिटी फोटोग्राफर असलेल्या विरल भियानाने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने सांगितले की, राखी सावंत खरंच प्रेग्नेंट होती, मात्र दुर्दैवाने तिचे मिसकॅरेज झाले.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

विरल भियानाने याबाबत राखीशी संवाद साधला असता, तिने सांगितले की, “हो मी प्रेग्नेंट होती. बिग बॉस मराठीमध्ये मी हे बोलली देखील होती, मात्र माझ्यावर कोणी विश्वास ठेवला नाही. सर्वांना वाटले मी मजाक करत असेल आणि कोणीच तेव्हा मला सिरियसली घेतले नाही. मी प्रेग्नेंट तर होती, मात्र माझे मिसकॅरेज झाले.”

तत्पूर्वी राखीसोबत लग्न केल्याच्या गोष्टीवर आदिल खान सतत नकार देत होता. मात्र नंतर त्याने लग्न केल्याचे कबूल केले. आदिल खानने सोशल मीडियावर त्या दोघांच्या निकाहचा फोटो पोस्ट केला आणि सांगितले की, ते विवाहित असून, त्याने कधीच त्यांचे लग्न झाल्याचे अमान्य केले नाही. सध्या तो काही गोष्टी ठीक करत आहे. राखीने मीडियामध्ये बोलताना तिचे लग्न वाचण्याचे श्रेय सलमान खानला दिले. दरम्यान राखी सावंतच्या आईला कॅन्सरनंतर ब्रेनट्युमर झाल्याचे निदान झाले आहे. सध्या तिची आई उपचारासाठी ऍडमिट असून, मुकेश अंबानी तिच्या आईवर उपचार करत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कुंडली भाग्य मालिकेमध्ये येणार २० वर्षांचा लीप, ‘हा’ मुख्य अभिनेता सोडणार मालिका?

कबीर बेदीने वयाच्या 70 व्या वर्षी 30 वर्षांनी लहान प्रेयसीसाेबत केले लग्न, वाचा संपूर्ण किस्सा

हे देखील वाचा