Friday, January 16, 2026
Home टेलिव्हिजन बापरे बाप! दुसऱ्यासोबत रोमान्स करताना सापडली राखी, संतापलेल्या आदिलने केली मारहाण

बापरे बाप! दुसऱ्यासोबत रोमान्स करताना सापडली राखी, संतापलेल्या आदिलने केली मारहाण

ड्रामा क्विन राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या तिच्या प्रेमप्रकरणामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. राखी सावंत सध्या तिचा बॉयफ्रेंड आदील खानमुळे चर्चेत आहे. राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानी यांचे प्रेम सर्वश्रुत आहे. राखी आणि आदिलच्या प्रेमकहाणीबद्दल क्वचितच कोणाला माहिती नसेल. दोघेही अनेकदा एकत्र फिरताना दिसत असतात. नुकताच या दोघांचा म्युझिक व्हिडिओही रिलीज झाला असून, त्याबाबत राखी सावंतने एक धक्कादायक गोष्ट शेअर केली आहे. काय आहे राखीने सांगितलेला तो रंजक किस्सा चला जाणून घेऊ. 

राखी सावंत सध्या फक्त तिचा बॉयफ्रेंड आदील खानबद्दलच सर्वत्र बोलताना दिसत असते. राखीच्या कपड्यांपासून तिच्या लूकपर्यंत सगळ्या गोष्टी आदील ठरवत असल्याचेही राखीने नुकतेच सांगितले होते. यावरून आदिल त्याच्या गर्लफ्रेंड म्हणजेच राखीबद्दल किती सकारात्मक आहे हे स्पष्ट होते. आदिलला राखीकडे कोणीही पाहू नये असे वाटतेय ETimes ला दिलेल्या मुलाखतीत राखीने आदिलच्या स्वभावाबद्दलही सांगितले आहे.

‘तू मेरे दिल में रहने लायक नहीं’ या गाण्यात राज सरांसोबत एक रोमँटिक सीन होता, असे राखीने सांगितले. आदिलला याची जाणीव नव्हती. पुढे बोलताना राखी म्हणते की, मला त्या सीनबद्दल सांगण्यात आले होते जिथे खलनायक येऊन माझ्यासोबत रोमान्स करेल. हे पाहून नायकाला धक्का बसेल आणि तो दुखी मनाने परत येईल. गाण्याचे शूटिंग सुरू झाले आणि सर्व काही सांगितल्याप्रमाणे चालू होते.

पण आदिलला या सीनबद्दल काहीच माहीत नव्हते. म्हणूनच राखीचा रोमँटिक सीन सुरू झाला आणि हे सर्व आदिलला पाहवले नाही. यानंतर तो राखीसोबत रोमान्स करत असलेल्या ऑनस्क्रीन खलनायकाला मारायला गेला. खरंच असं घडलं असं राखीचं म्हणणं आहे. आदिलला राज सरांनी शांत केले आणि सांगितले की हे खरे नाही तर अभिनय आहे. राखी आणि आदिलचे ‘तू मेरे दिल में रहने लायक नहीं’ हे गाणे रिलीज झाले आहे. गाण्यात राखी आणि आदिलची केमिस्ट्रीही चांगलीच पसंत केली जात आहे. या गाण्याला चार लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. आदिलला पाहून तो इतका चांगला अभिनय करू शकतो असे वाटले नाही. पण जेव्हा म्युझिक व्हिडिओ आला तेव्हा त्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

हेही वाचा – अंजली अरोरानंतर आणखी एका भोजपुरी अभिनेत्रीचा एमएमएस व्हिडिओ लीक? चाहते आणि ट्रोलर्समध्ये रंगला वाद
जॉनी डेप आणि अँबर हर्ड प्रकरणावर येणार चित्रपट ‘या’ दिवशी पोहायला मिळणार मोफत प्रिमियर
नोरा, जॅकलीनचं नव्हे, ‘ही’ मराठमोळी अभिनेत्रीही फसली सुकेश चंद्रशेखरच्या जाळ्यात, दिली इतक्या कोटींची गिफ्ट

 

हे देखील वाचा