Wednesday, July 3, 2024

ड्रामा क्वीन राखी सावंतचा नवीन ड्रामा, पती रितेश कुमार फक्त मित्र असल्याचे केले जाहीर

ड्रामा क्वीन राखी सावंत सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी आपल्या पतीबद्दल तर कधी प्रेमाबद्दल प्रत्येक वेळी नवनवीन खुलासे करताना ती दिसत असते. म्हणूनच तिला ड्रामा क्वीन म्हणतात. काही दिवसांपूर्वी राखी सावंत आणि पती रितेश कुमार यांचा लिपलॉक सीन व्हायरल झाला होता. आता राखीने याचबद्दल नवीन खुलासा करत सगळ्यांना गोंधळात टाकले आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) आपल्या विवादास्पद बोलण्याने नेहमीच चर्चेत असते. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर निघाल्यापासून ती सोशल मीडियावर चर्चेत आहे. यावेळी अनेकदा ती पती रितेश कुमारसोबत फिरताना दिसली होती. मात्र आता राखीने याबद्दल नवीन खुलासा करत तो फक्त मित्र असल्याचे म्हणले आहे ज्यामुळे सगळेच गोंधळात पडले आहेत.

राखी सावंतने अलीकडेच एका मुलाखतीत याबद्दलचे विधान केले आहे. या मुलाखतीत राखीने अनेक विषयांवर आपले मत व्यक्त केले. ज्यावेळी घरातून बाहेर पडल्याची बातमी कानावर पडली तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला असेही ती यावेळी म्हणाली. याबद्दल बोलताना राखीने सांगितले की, “बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांना सर्वात जास्त मी हसवले आहे. माझ्यामुळेच त्यांचे मनोरंजन झाले आहे मात्र तरीही मला मत मिळाली नाहीत हा माझ्यासाठी मोठा धक्का आहे. मी देवाला प्रार्थना करत होते, या कार्यक्रमात मी मनोरंजन करण्यासाठी खूप प्रयत्न केले.” त्याचबरोबर राखीने या कार्यक्रमात प्रत्येक वेळी मीच सर्वात जास्त मनोरंजन केले आहे. मात्र मला दरवेळी बाहेर काढण्यात येते असे मत व्यक्त केले. बिग बॉसच्या विजेतेपदाबद्दल बोलताना राखी म्हणाली की, “हा कार्यक्रम मला जिंकायचा होता. त्यासाठी मी सगळे प्रयत्न केले. माझे कुणाशी मतभेद नाहीत परंतु मला विजेतेपद मिळवायचे होते.”

पुढे आपला पती रितेश कुमारबद्दल बोलताना राखीने सांगितले की, “आम्ही आत्ता फक्त मित्र आहोत, बिग बॉसच्या घरात पती पत्नी होतो. लोक याबद्दल त्याला भाड्याचा नवरा म्हणत आहेत तर म्हणू दे, पुढे सगळे ठीक होईल.” राखी सावंत सध्या जीममध्ये जीवतोड मेहनत घेत असून अभिनेता सलमान खानने तिला चित्रपटात काम देतो पण त्यासाठी वजन कमी करण्याचा सल्ला दिल्याचे बोलले जात आहे. याबद्दल राखी सावंतनेही माहिती दिली आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा