Tuesday, July 9, 2024

‘तुमच्यासारख्या लोकांमुळेच मुंबई बंद झाली…’, मास्क न घालता सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यावर भडकली राखी सावंत

अभिनेत्री राखी सावंत रागाच्या भरात काय बोलेल, हे सांगणे कठीण आहे. पूर्णवेळ आपली वेगळीच ऊर्जा दाखवत राहणारी राखी सावंत, माध्यमांशी बोलताना बर्‍याच वेळा दिसते. ती तिच्या चाहत्यांशीही सतत संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. पण कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे अभिनेत्रीचा हा दृष्टीकोन थोडा बदलला आहे आणि आता तिचा वेगळा अंदाजही पाहायला मिळत आहे.

राखी सावंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री तिच्या एका चाहत्यावर चिडलेली पाहायला मिळाली. तिला इतका राग आला की ती म्हणाली, “तुमच्यासारख्या लोकांमुळेच मुंबई बंद झाली आहे.” आता राखीला इतका राग का आला? याचे कारण म्हणजे, ज्या चाहत्याला राखीसोबत सेल्फी काढायची होती, त्याने मास्क घातला नव्हता. वाढत्या प्रकरणांमुळे, मास्क न लावता सेल्फी क्लिक करणे धोक्याचे आहे. आता राखीदेखील यामुळे घाबरलेली आहे.

तसेच, राखी सावंतला इतका राग येणे साहजिकच आहे. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना आऊट ऑफ कंट्रोल झालेला दिसत आहे. मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे, तर बर्‍याच ठिकाणी पूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता देखील वाढत आहे. वाढत्या प्रकरणांमुळे मोठ्या चित्रपटांचे शूटिंगही बंद झाले आहे. यामुळे मनोरंजन उद्योगाला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. अशा परिस्थितीत राखीने मास्क न घातल्याबद्दल फटकारणे, पूर्णपणे योग्य होते आणि चाहते तिचे कौतुक करतानाही दिसत आहेत.

राखीविषयी बोलायचे झाले, तर ती ‘बिग बॉस 14’मुळे खूप चर्चेत आली होती. बऱ्याच दिवसांपासून चित्रपट आणि डान्सच्या दुनियेपासून दूर राहिलेल्या राखीला, बिग बॉसने जबरदस्त लोकप्रियता मिळवून दिली. सोबतच तिला ‘एन्टरटेन्मेंट क्वीन’ ही पदवीही मिळाली आहे. यामुळे तिला बर्‍याच ऑफर्सही मिळत असल्याचे दिसून येत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ओ तेरी!’ अनुष्कानेे पती विराटला एकदा नव्हे, तर दोनदा उचलून दाखवली आपली ताकद, चाहत्यांनी म्हटले ‘शक्तिमान’

-‘बिग बॉस १४’ फेम निक्की तांबोळीच्या बाथरूममधील व्हिडिओने वेधले चाहत्यांचे लक्ष, ग्लॅमरस अंदाजावर चाहते फिदा

-मल्टीकलर स्विमसूटमध्ये बोल्ड अंदाजात दिसली प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर विंगेट; पाठीवरील टॅटूने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

हे देखील वाचा