Saturday, June 29, 2024

आदिल दुर्रानीने लग्नाला दिला नकार, राखी सावंतची कॅमेऱ्यासमोर रडारड

बॉलिवूड आणि टीव्ही क्षेत्रामध्ये सतत चर्चेत असणारी प्रसिद्ध अभिनेत्री ड्राम क्वीन म्हणजेच राखी सावंत आपल्या दिलखुलास अंदाजामुळे ओळखली जाते. नुकतंच अभिनेत्रीन तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानी सोबत लग्न केलं असून  सोशल मीडियावरही या दोघांच्या लग्नाचे फोटो तुफान व्हायरल होताना दिसून येत आहे. त्याशिवाय राखीने देखिल तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन काही फोटो आणि मॅरेज सर्टीफिकेट शेअर केलं आहे. अभिनेत्री सतत जगामसोमर तिच्या लग्नाची गोष्ट सांगत आहे मात्र, आदिलने लग्नाच्या गोष्टीवर नाकार दर्शवला आहे. भले अभिनेत्री लग्न झाल्याचा गाजावाज करत आहे मात्र, आदिलने या गोष्टीला स्वीकरलं नाही त्यामुळे रखी खूपच त्रस्त झाली आहे त्याशिवया तिने आदिलसाठी इस्लाम धर्म देखिल स्वीकारला आहे.

सतत चर्चेत असणारं प्रसद्ध जोडपं आदिल दुर्रानी (Adil Durrani) आणि ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant)  हे दोघाही सतत आपलं प्रेम दाखवून देण्याची एकही संधी सोडत नाही. अशातच त्यांच्या लग्नाच्या फोटोंनी तर कहरच केला आहे. राखी सतत आपल्या लग्नाचा दुजोरा देत असते मात्र, आदिलने यावर नकार दिला आहे त्यामुळे राखी खूपच टेन्शनमध्ये आहे त्याशिवाय तिने पॅपराझींना दिलेल्या एक मुलाखतीचा व्हिडिओ देखिल सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती आदिलबद्दल बोलत आसून ढसा ढसा रडत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राखी म्हणते की, “आदिलने आमच्या लग्नाला नकार दिला आहे, त्याशिवा ही गोष्ट माझ्या आईला समजली तर तीचे काय होईल. माझे कुटुंबिय देखिल मला सांगत आहेत की, ही बातमी तुझ्या आईपर्यत पोहोचून नको देऊ, तीला समजले तर काय होईल. हे देवा हे सगळं माझ्याच नशिबात का होतंय असं म्हणते. एक पत्रकार प्रश्न विचारतो की, ‘आदिलचे कुटुंबिय काय म्हणाले’, तेव्हा राखी म्हणते की, “त्याच्या कुटुंबियातील लोक खूप चांगले आहेत. त्याशिवया मी त्यांच्यासोबत लगेच मिसळून राहिल असंही राखी म्हणाली मात्र, आदिल का असं करत आहे.”

 

View this post on Instagram

 

त्याशिवाय राखीने भोजपूरी अभिनेत्री मोनालिसा हिच्यासोबत स्वतं:च दु:ख शेअर केलं असून तिने तिला लग्नाचे फोटो आणि मॅरेज सर्टिफिकेट देखिल दाखवलं आहे. याव र मोनालिसा म्हणते की, “हा हे तर मी बघितलं आहे.” यावर राखी म्हणते की, “माझा निकाह झाला आहे. माझ कोर्ट मॅरेज झालं आहे आणि आता हे लोक माझ्या मागे फिरत आहेतकी, जा कोर्टामध्ये शोध. माझ्याकडे सर्टिफिकेट आहे. दुधाचं दुध आणि पाण्याचं पाणी होईल.”

 

View this post on Instagram

 

राखा सावंत सतत तिच्या लग्नाबद्दलचे पुरावे देत आहे त्याशिवा तिने एका मुलाखतीदम्यान सांगितेल होते की, तिने आदिल सोबत निकाह केला आहे. त्याशिवाय त्याने त्याचं आवडतं फातिम हे नाव देखिल तिला दिलं आहे. राखी म्हणाली की तिने तिच्या मर्जीने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. मात्र, ज्याच्यासाठी तिने एवढं सगळं केलं तोच या लग्नाला नकार देत आहे. त्यामुळे राखी खूपच टेंशनमध्ये आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘आधी भारतीय संस्कृती शिका मग मला…’,उर्फी जावेदचं चित्रा वाघ यांना सडेतोड प्रत्युत्तर
या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या…

हे देखील वाचा