Monday, July 1, 2024

‘मी माझ्या बाजीरावला शोधतेय’, म्हणत राखी सावंत रस्त्यावर दिसली ‘मस्तानी’च्या वेशात

‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री राखी सावंत हिने सिद्ध केले आहे की, ती खूप चांगल्या प्रकारे प्रेक्षकांचे मनोरंजन करू शकते आणि त्यांच्या मनोरंजनासाठी ती काहीही करू शकते. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ती नेहमीच काहीतरी असे वेगळे करते की, सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे आकर्षित होते. राखी नुकतीच मस्तानीच्या अवतारात दिसली आहे. पोशाख घालून ती मुंबईच्या रस्त्यावर तिच्या बाजीरावला शोधत होती. राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप धुमाकूळ घालत आहे.

बॉलिवूडची ड्रामा क्वीन आता या कोरोनाला आणि लॉकडाऊनला खूप कंटाळली आहे. ती तिचा पती रितेशला भेटण्यासाठी खूप उत्सुक दिसत आहे. परंतु त्यांची काही भेट होत नाहीये. त्यामुळे ती आता मस्तानीच्या वेशात तिच्या बाजीरावला शोधत आहे. ती या व्हिडिओमध्ये म्हणत आहे की, “ना ही लस मिळत की, ना कपड्यांची दुकाने खुली आहेत. त्यामुळे मी अशीच भटकत आहे. मुंबई पण बंद आहे. हा लॉकडाऊन पण संपत नाहीये. मी खूप त्रस्त झाले आहे. त्यामुळे मी आज खूप दुःखी आहे. ना मी खतरों के खिलाडी या शोमध्ये जाऊ शकले. लग्न झालेलं असून पण मी माझ्या पतीला भेटू शकत नाही. मला ‘नच बलिये’ हा एक शो मिळाला होता, पण तो देखील बंद होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. माझ्या पतीला भेटण्याची ही एक संधी होती आता ती पण जाणार आहे. मी आता माझ्या पतीला कधीच नाही भेटू शकत. तो तिकडे बर्फात बसून काय माहीत कोणता गोळा खात असेल. तुम्ही मला मीरा म्हणा नाहीतर मस्तानी म्हणा, पण मी माझ्या बाजीरावला शोधत आहे.”

या व्हिडिओमध्ये एक डब्बेवाला दिसत आहे. त्याला राखी सावंत विचारते की, “तू माझा बाजीराव आहेस का?” यावर तो म्हणतो की, “मी तर डब्बेवला आहे. डब्बा पोहोचवायला आलो आहे.” यावर राखी म्हणते की, “अच्छा मला वाटलं तू बाजीराव आहेस, मी मस्तानी आहे. उद्यापासून मला पण डब्बा देत जा.”

नुकतेच राखी सावंत आणि मिका सिंग एकत्र स्पॉट झाले होते, तेव्हा तिने सांगितले होते की, ते दोघे खूप चांगले मित्र आहेत. त्यानंतर ती मिका सिंगच्या पाया देखील पडली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा