बाॅलीवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant)पुन्हा एकदा ट्रोलर्सचा सामना करत आहे. शेफारली जरीवालाच्या (Shefali Jariwala)निधनानंतर तिने एक व्हिडीओ टाकला आणि त्यामुळे ती अडचणीत आली आहे.
‘कांटा लगा’ गर्ल शेफाली जरीवालाच्या अचानक निधनामुळे फक्त टीव्ही नाही, तर बाॅलीवूडमध्ये कलाकारही खूप दुखी आहेत. सगळ्यांना हेच खटकतयं की, इतक्या लहान वयात तिने जग साेडलं. पण या सगळ्यात राखी सावंत मात्र साेशल मीडियावर ट्राेल हाेतीये. तिने एक व्हिडीओ शेअर केला, जाे लाेकांना आवडला नाही, आणि त्यामुळे अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे.
राखी सावंत सध्या दुबईत आहे. शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी तिने एक व्हिडीओ शेअर करुन सांगितलं हाेतं की, “मला खूप वाईट वाटतयं, पण मी दुबईत असल्यामुळे शेफालीला शेवटचा निराेप देऊ शकत नाही”. पण दुसऱ्या दिवशी तिचं वागणं एकदम बदललेलं दिसलं. नवीन व्हिडीओमध्ये तिने शेफालीबद्दल काहीतरी अशा प्रकारचं बाेललं, जे ऐकून सगळेच थक्क झाले.
राखी सावंतने हा व्हिडीओ तिच्या इन्सटाग्रामवर टाकलाय. व्हिडीओत ती म्हणते, “मी इतकी घाबरले की आता भूक लागली की, लगेच काहीतरी खाऊन टाकते. शेफाली, मी तुला खूप मिस करतेय. आत्ताच कळलं की, मरणाच्या दिवशी तू उपाशी हाेतीय…बीपी लाे झालं हाेतं. बाॅलीवूडमध्ये सुंदर दिसण्यासाठी मुलींना काय काय सहन करावं लागतं! पण हे सगळं पाहून मी आता उपाशी राहत नाही, उलट भरपुर खायला लागलेय”.
अभिनेत्री पुढे म्हणते, “उपाशी राहिलं तर कधी बीपी कमी हाेईल, कधी जास्त हाेईल काही खात्री नाही. म्हणूनच मी म्हणते, डाळ-भाकरी, भाजी सगळं खा! मी तर आधीपासूनच सुंदर आहे. शेफालीसाेबत जे घडलं त्यामुळे मी खरंच घाबरले आहे, कारण मी दुबईत एकटी राहते…स्वतःची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते. इतकं बारीक व्हायचं तरी काय उपयाेग, की जीवच जाईल! जाे आपल्यावर प्रेम करताे ताे जाड असलं तरी करेल. आता मी ठरवलयं, जरी जाड झाले तरी चालेल!”
या व्हिडीओवर लाेकांनी खूप कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिलं, “कृपया काेणाच्या मृत्यूचं मजाक करु नकाेस”. दुसऱ्याने म्हणटलं,”मग तूच प्लास्टिक सर्जरीसाठी का जातेस?” एक युजर म्हणाला, “तुझ्या चेहऱ्याचं काय झालंय? स्वतःवर हे प्रयोग करणं बंद कर”. पण या सगळ्यांमध्ये काही लोक राखीचा सपोर्टही करताना दिसले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
राजकुमार रावच्या मालिकचा टीझर प्रदर्शित; पहिल्यांदाच साकारतोय गँगस्टरची भूमिका…