Friday, July 12, 2024

जेव्हा राखी सावंतने व्यक्त केली विमान उडवण्याची इच्छा तेव्हा प्रवाशांनी दिलेले उत्तर ऐकून तुम्हालाही फुटेल हसू

मनोरंजनविश्वातली ड्रामा क्वीन म्हणून राखी सावंत ओळखली जाते. राखी नेहमीच तिच्या अतरंगी आणि विचित्र गोष्टींमुळे नेहमीच प्रकाशझोतात येत असते. तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. या व्हिडिओमुळे राखीला तुफान प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळत असते. आता पुन्हा एकदा राखीचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे.

राखीचा नवीन व्हायरल होणारा व्हिडिओ एका प्लेनमधला असून, या व्हिडिओमध्ये राखी प्रवास करताना दिसत आहे. मात्र तिची एक इच्छा आहे की, तिने एकदा तरी प्लेन उडवावे. याबद्दल ती विमानातील इतर प्रवाशांना विचारते की, ‘आज मी हे विमान उडवू का?’ तर सर्व ओरडून बोलतात ‘नाही’ हे ऐकून तुम्ही तुमचे हसू थांबवू शकणार नाही. कारण प्रवाशांचे हे उत्तर ऐकून राखी देखील जोरजोरात हसायला लागली. त्यानंतर ती पुढे म्हणते, “जर गरम झाले तर तुमच्या बाजूला असणाऱ्या खिडक्या उघडून बसा.’ सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायला होत असून हा व्हिडिओ कोरिओग्राफर राजीव खिंचीने शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये राखीने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला असून, त्यात ती खूपच कुल दिसत आहे. राखीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एयरपोर्टवरील इतरही अनेक मजेशीर व्हिडिओ शेअर केले आहेत. एका व्हिडिओमध्ये ती रडताना दिसत असून ती सांगते माझी पर्स हरवली आहे.

राखी सावंताबद्दल सांगायचे झाले तर ती शेवटची सलमान खानच्या बिग बॉस १५ मध्ये दिसली होती. या शोमध्ये तिने तिच्या नवऱ्याला रितेशला देखील जगासमोर आणले. मात्र शोमधून बाहेर आल्यानंतर त्यांचे नाते तुटले. त्यानंतर तिने सोशल मीडियावर अनेक भावुक पोस्ट शेअर केल्या होत्या.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-  

राष्ट्रीय सागरी दिनाच्या निमित्ताने स्पृहाने ऐकवली कुसुमाग्रजांची ‘कोलंबसाचे गर्वगीत’ कविता

‘या’ चित्रपटांमुळे एक रात्रीत मिळाली दाक्षिणात्य दिग्दर्शकांना पॅन इंडिया ओळख, जाणून घेऊया त्या दिग्दर्शकांबद्दल

स्वतःचे सीन स्वतःच करणाऱ्या अक्षय कुमारने थेट ४६ व्या मजल्यावरून मारली होती उडी, तेव्हा…

हे देखील वाचा