Saturday, June 29, 2024

‘बिग बॉस’च्या घराबाहेर राखी सावंतला चावला कुत्रा; म्हणाली, ‘मी पण त्याला चावणार’

राखी सावंत अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. तिच्या अनोख्या शैलीमुळे ती सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध झाली आहे. तिला अनेक व्हिडिओंमध्ये पॅपराजींसोबत विनोद करताना देखील पाहिले जाते. अलीकडेच राखी सावंतला कुत्र्याने चावले आहे. राखीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

यासह तिने लिहिले की, “अरे, माझ्याबरोबर काय होत आहे, मला आता इंजेक्शन घ्यावे लागतील. कुत्र्याने मला चावले आहे, मित्रांनो, आता मी कुत्र्याला चावेन.” राखी पॅपराजीला सांगते की, तिला कुत्रा चावला होता, त्यामुळे ती दोन दिवस विश्रांती घेत आहे. तसेच या व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की, राखी प्रत्येक वेळेस सारखी चुलबुली दिसत नाही.

राखी म्हणाली की, “बिग बॉसच्या सेटवर मला कुत्र्याने चावले होते. सेटवरून घरी जात असताना रात्री कुत्र्याने मला चावले.” त्याचबरोबर ती पुढे म्हणते की, “इंजेक्शन्स घ्यावी लागतील का?” राखी म्हणते की, “आयुष्य खराब झाले आहे, कधी लसीचे इंजेक्शन घ्या, कधी व्हिटॅमिनचे घ्या आणि कधी कुत्रा चावल्यामुळे घ्या. इंजेक्शन घेताना मी स्वतः इंजेक्शन बनले आहे, मी विचार करत आहे की मीच कुत्र्याला चावावं.”

व्हिडिओच्या शेवटी, राखी बिग बॉसच्या सेटमधून बाहेर पडल्याची झलकही दिसत आहे. यामध्ये तिच्या मागे असलेले कुत्रे तिला त्रास देत आहेत. अलीकडेच राखी सावंत बिग बॉसच्या घराबाहेर ‘स्पायडर वुमन’ म्हणून पोहोचली होती. येथे त्याने जोरदार राग व्यक्त केला. याच दरम्यान, राखी नाचली आणि कॅमेरासमोर इतर अनेक विचित्र गोष्टी करताना दिसली. कोणाला राखीची ही शैली आवडली, तर कोणी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. (Rakhi Sawant was bitten by a dog, she said I will also bite the dog)

राखी नेहमी पॅपराजींसोबत मजा मस्ती करताना दिसते. एकदा राखीने विनोद करत पॅपराजीला विचारले होते की, “तुम्हाला कसे काय कळले की मी कुठे आहे? माझा ड्रायव्हर तुम्हाला माझी माहिती तर देत ​​नाही ना?”

त्याचबरोबर राखी सावंत ‘बिग बॉस’च्या १४ व्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती आणि तिथे तिने बराच ड्रामा देखील केला होता. हंगामाच्या शेवटी, राखी सावंत १४ लाख रुपये किमतीची बॅग घेऊन घरातून बाहेर पडली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘पोन्नियन सेलवन’ सिनेमातील ऐश्वर्याचा फोटो लीक; अभिनेत्री दिसली ‘या’ अवतारात

-तब्बल ३६ वर्षांपूर्वी ‘या’ जाहिरातीत दिसला होता ‘भाईजान’; हँडसम लूक पाहून चाहते नव्याने पडतायेत प्रेमात

-अपारशक्ती खुराणा लवकरच होणार बाबा, शेअर केला पत्नीच्या डोहाळे जेवणाचा सुंदर व्हिडिओ

हे देखील वाचा