Tuesday, July 9, 2024

‘स्पायडर वूमन’नंतर राखी सावंतच्या ‘बार्बी’ लूकने वेधले सर्वांचे लक्ष; ‘बिग बॉस ओटीटी’साठी झालीये का तयार?

अभिनेत्री राखी सावंत आणि मनोरंजन हे एक परफेक्ट समीकरण आहे. कोरोनाच्या काळातही तिने मनोरंजन थांबवले नाही. कोणत्या ना कोणत्या पद्धतीने ती नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. कधी रस्त्यावर तर कधी कॉफी शॉपमध्ये अनेकवेळा ती स्पॉट झाली आहे. तिची लोकप्रियता एवढी वाढली आहे की, ती दिसता क्षणीच सगळे तिच्याभोवती घोळका घालतात. मागील काही दिवसांपासून तर ती जोरदार चर्चेत आली आहे. अशातच तिचा आणखी एक निराळा लूक समोर आला आहे.

व्हायरल भयानीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून राखी सावंतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने बार्बी डॉलचा लूक केला आहे. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, राखीने एखाद्या डॉलप्रमाणे केशरी रंगाचा लॉन्ग फ्रिल ड्रेस घातला आहे. तसेच कानात मोठे इअरिंग घातले आहेत. सोबतच तिने मल्टी कलर स्टोनचा कमरेचा बेल्ट लावला आहे. यात ती पॅपराजींना पोझ देताना दिसत आहे. सगळेजण तिला ‘राखी जी राखी जी इकडे बघा’ असे म्हणत असतात. त्यानंतर ती पॅपराजींना विचारते “मी छान दिसत आहे का?” यावर सगळे तिला “खूप छान दिसत आहे” असे सांगतात. तिचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. (rakhi sawant’s barbie look viral on social media )

सध्या सर्वत्र राखी ‘बिग बॉस ओटीटी’वर प्रवेश करणार आहे, अशा बातम्या येत आहेत. तसेच तिचा हा लूक देखील बिग बॉसच्या घरात एंट्री करण्यासाठी आहे, असे म्हटले जात आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी राखीने स्पायडर मॅनचा लूक केला आहे. यावर ती म्हणत होती की, बिग बॉसने तिला बोलावले नाही, म्हणून ती उपोषण करत आहे. तिच्या या स्पायडरमॅनच्या लूकमधील व्हिडिओ देखील जोरदार व्हायरल झाला होता.

राखी सावंत ही ‘बिग बॉस १४’ मध्ये देखील स्पर्धक होती. या शोमध्ये सर्वांनी तिची मस्ती आणि मनोरंजन पाहिलेच आहे. बिग बॉसनंतर राखी खूपच चर्चेत आली. ती सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नुकतेच काही दिवसांपूर्वी तिचे ‘ड्रीम मे एंट्री’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ब्यूटी क्वीन’ डिंपल हयातीला रवी तेजाने दिले वाढदिवसाचे खास गिफ्ट; शेअर केला आगामी ‘खिलाडी’चा रोमॅंटिक पोस्टर

-खण स्कर्ट घालून रुपाली भोसलेने शेअर केले ‘हटके’ फोटोशूट, मात्र सर्वत्र रंगलीय ड्रेसची चर्चा

-‘ही’ व्यक्ती आहे अंकिता लोखंडेसाठी खूप खास; फोटो शेअर करत म्हणाली, ‘तू माझ्यासाठी…’

हे देखील वाचा