‘बिग बॉस’ फेम आणि बॉलिवूडमध्ये ‘ड्रामा क्वीन’ या नावाने प्रसिद्ध असणारी अभिनेत्री म्हणजे राखी सावंत. सध्या लॉकडाऊनमुळे सगळे कलाकार घरातच आहेत. तरीही ते वेगवेगळ्या प्रकारे मनोरंजन करत असतात. पण लॉकडाऊन असतानाही राखी सावंत अनेक वेळा रस्त्यावर स्पॉट झाली आहे. यामुळे ती सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. ती जेव्हा रस्त्यावर येते, तेव्हा तिचे चाहते सेल्फी घेण्यासाठी खूप गर्दी करत असतात. असाच काहीसा प्रकार गुरुवारी (३ जून) घडला आहे. तिची एक छोटी चाहती तिच्याकडे सेल्फी घेण्यासाठी आली होती. पण राखीने तिच्यापुढे एक अट ठेवली. जेव्हा तिने ती अट पूर्ण केली, तेव्हाच राखीने तिला सेल्फी दिला. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल भयानीने शेअर केला आहे.
राखी सावंत ही मुंबईच्या रस्त्यावरून जात असते. तेवढ्यात एक छोटी मुलगी येते आणि तो राखीकडे सेल्फी मागते. त्यावेळी राखी तिला म्हणते की, “जर तू माझ्यासाठी डान्स केला तरंच मी तुला सेल्फी देणार.” यावर ती मुलगी रस्त्यात डान्स करते, तेव्हा राखी देखील तिच्यासोबत डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. त्यांनतर ती त्या छोट्या मुलीसोबत सेल्फी काढते. ती खूपच खुश होते.
तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. राखी चाहते या व्हिडिओवर कमेंट करताना दिसत आहे. राखीने या बाबत मिलिंद सोमण यांना फॉलो केले आहे, असे तिचे चाहते म्हणत आहेत.
काही दिवसांपूर्वी एका महिलेने मिलिंद सोमण यांच्याकडे सेल्फी मागितला होता. त्यावेळी फिटनेस प्रेमी मिलिंद सोमण यांनी तिला सेल्फीसाठी रस्त्यात पुश अप्स करायला सांगितले होते. या महिलेने साडी घालून भर बाजारात सेल्फीसाठी पुश अप्स मारले होते. त्यांनतर त्यांनी त्या महिलेला सेल्फी दिला होता. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…