Monday, October 2, 2023

रक्षाबंधन विशेष! भावंडांचे प्रेम दर्शविणाऱ्या ‘या’ चित्रपटांसह खास बनवा तुमचे रक्षाबंधन

रक्षाबंधन हा सण भाऊ आणि बहिणीचा पवित्र सण असतो. आजच्या दिवशी प्रत्येक बहिण आपल्या भावाला राखी बांधते आणि तिचे रक्षण करण्यास सांगत असते. जर रक्षाबंधनाच्या सणाच्या दिवशी भाऊ आणि बहिणीच्या नात्याबद्दल खूप चर्चा होते. हा सण शिकवतो की, प्रेम असो किंवा भांडण असो, पण तुम्ही तुमच्या भावाला किंवा बहिणीला अजिबात दुर्लक्ष करू शकत नाही. भावा- बहिणीच्या प्रेमळ नात्यावर अनेक चित्रपटही बनवले जातात. अशा काही चित्रपटांबद्दल आज या लेखातून आपण जाणून घेऊयात. विशेष म्हणजे हे चित्रपट तुमच्यासाठी नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहेत.

दिल धडकने दो
हा चित्रपट असून पूर्णपणे कौटुंबिक जीवनावर आधारित आहे. वास्तववादी नात्यांचे हे भावपूर्ण चित्रण हृदयाला स्पर्श करते. या चित्रपटात रणवीर सिंग आणि प्रियांका चोप्रा यांनी बहीण भावाची भूमिका साकारली आहे. जे एकमेकांची बाजू घेण्यासाठी कोणत्याही थराला जातात.

द स्काई इज पिंक
ही एक सुंदर अशी कौटुंबिक कथा आहे, जी एका कुटुंबाच्या संघर्षांचे दर्शन घडवते. या चित्रपटात भाऊ आणि बहीण यांच्यातील संबंध देखील अत्यंत भावपूर्ण पद्धतीने दाखवले आहेत.

त्रिभंग
नातेसंबंधांच्या या हृदयस्पर्शी कथेत बहिणींमध्ये असलेले एक सुंदर असे नाते दाखवण्यात आले आहे. यात महिला सक्षमीकरणाचा संदेश देखील दिला आहे

दंगल
या चित्रपटाची मुख्य कथा कुस्तीवर आधारित असून या चित्रपटात अभिनेता आमिर खान मुख्य भूमिकेत आहे. हा एक भावनिक चित्रपट आहे, जो वडिलांच्या संघर्षाचे चित्रण करतो.

लिटिल वुमन
ही कमिंग-ऑफ-एज स्टोरी लुईसा मेय अल्कोट यांच्याद्वारे लिहिलेल्या कादंबरीवर आधारित आहे. हा चित्रपट चार बहिणींच्या जीवनावर आधारित आहे.

यस डे

हा चित्रपट पालकांवर केंद्रित आहे, जो सामान्यतः मुलांना प्रत्येक गोष्टीसाठी नकार देत असतो. तुम्हाला काही हलकेफुलके बघायचे असेल, तर हा विनोदी आणि भावनिक चित्रपट बघाच.

 

हेही नक्की वाचा-
कॉलेजच्या रॅगिंगने बदलले चित्रांगदा सिंगचे आयुष्य, ‘अशी’ मिळाली पहिली ऑफर
रक्षाबंधन स्पेशल! भाऊ बहिणींचे सुंदर नाते दाखवणारे ‘हे’ चित्रपट पाहाच

हे देखील वाचा