Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

रकुल प्रित सिंग आणि जॅकी भगनानी अडकणार लग्नबंधनात, गोव्यात बांधणार लग्नगाठ

बॉलीवूडच्या मोस्ट फेवरेट कपल्सपैकी एक, रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरु आहेत. या लव्हबर्ड्सचं डेस्टिनेशन वेडिंग गोव्यात(goa) होणार असल्याचीही चर्चा सुरु आहे. दरम्यान, हे जोडपे ज्या दिवशी फेरे घेणार आहेत त्या दिवसाबद्दलही काही डिटेलस समोर आले आहेत. जाणून घेऊया कोणत्या दिवशी रकुल बनणार जॅकीची दुल्हनिया ?

रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी कोणत्या तारखेला करणार लग्न(wedding date) ?
रकुल(rakul preet singh) आणि जॅकी भगनानी 21 फेब्रुवारीला गोव्यात त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा आहे. 19 आणि 20 फेब्रुवारीला या जोडप्याचं प्री-वेडिंग फंक्शन्स होणार असल्याचंही समोर आलं आहे. एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, या जोडप्याच्या जवळच्या सूत्राने रकुल आणि जॅकीच्या लग्नाचे काही डिटेलस शेअर केले आहेत. रिपोर्टनुसार, सूत्राने सांगितलंय की, ‘हे कपल लग्नाची तारीख सिक्रेट ठेवू इच्छित आहे. डिझायनर्सपासून फोटोग्राफरपर्यंत कोणालाही या तारखेची माहिती देण्यात आलेली नाही. लग्न गोव्यात होत असल्याने प्रत्येकाला मोठ्या प्रमाणात तारखा सांगण्यात आल्या आहेत. हे लग्न संपूर्णपणे बॉलिवूड लग्न असणार आहे.’

कोणता डिझायनर तयार करणार रकुलच्या लग्नाचा लेहेंगा ?
रकुलच्या लग्नाचा लेहेंगा प्रसिद्ध फॅशन डिझायनर तरुण ताहिलियानी(fashion designer tarun tahiliani) डिझाइन करत असल्याची अफवा सध्याला पसरली आहे. लग्नानंतर हे जोडपं पुन्हा कामावर परतणार आहे. हे सर्व खरं असलं तरी, या जोडप्याने अजून त्यांच्या लग्नाबाबत ऑफिशीयली कंफर्म केलेलं नाही.

2021 पासून करतायत एकमेकांना डेट
रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांची लव स्टोरी कोणापासूनही लपलेली नाही. हे जोडपं 2021 पासून एकमेकांना डेट करत आहे. काही महिन्यांपूर्वी रकुलने तिच्या बॉयफ्रेंड जॅकीच्या(jackky bhagnani) वाढदिवसानिमित्त एक हृदयस्पर्शी नोट लिहिली होती. रकुलने लिहिले होते की, “ माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आजच्या दिवशी आणि प्रत्येकंच दिवशी तुला हवे ते सर्वकाही मोठ्या प्रमाणात मिळो अशी इच्छा. तुझ्यासारखा काइंडनेस आणि इनोसेंस भोटणं खुप रेअर आहे, तुझे जोकस खूप वाईट आहेत पण मला ते फनी आहेत हे मान्य करावे लागेल. यासगळ्याला जपून ठेव कारण ते तुझ्यासारखे लोक आता बनवत नाहीत. इथे एडवेंचर, ट्रॅवलिंग, खाणं आणि नेहमी सोबत आनंदी राहयचं आहे.

कसे भेटले रकुल आणि जॅकी ?
एका मुलाखतीदरम्यान रकुलने तिच्या जॅकीसोबतच्या नात्याबद्दल सांगितलं होतं. तेव्हा रकुल म्हणाली होती की, “आम्ही दोघे शेजारी राहात होतो पण आमचं कधीच बोलणं झालं नाव्हतं. जेव्हा लॉकडाऊन लागलं तेव्हा एका कॉमन फ्रेंडमुळे भेटलो. त्यानंतर आम्ही चांगले मित्र झालो. बराच वेळ एकमेकांसोबत एन्जॉय केल्यानंतर, आम्ही एकमेकांना डेट करायला सुरुवात केली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

तब्बल 16 वर्षांनी सई ताम्हणकर आणि श्रेयश तळपदे एकत्र, चाहत्यांसाठी ‘श्रीदेवी प्रसन्न’मध्ये मेजवानी
‘फायटर’ चित्रपटावर पाकिस्तानी अभिनेत्रीने लावले आरोप, सिद्धार्थ आनंदच्या उत्तराने केली सगळ्यांची बोलती बंद

हे देखील वाचा