बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग या दिवसात तिचा ‘सरदार का ग्रँडसन’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. एका आजीला तिच्या नातवाला भेटवण्यासाठी पाकिस्तानवरून आणणाऱ्या एका कुटुंबाची कहाणी कुटुंबातील प्रेम आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहे. प्रत्येक कलाकारांसाठी त्याचा चित्रपट महत्वाचा असतो, पण रकुल प्रीतसाठी हा चित्रपट खूप महत्त्वाचा आहे. कारण ही घटना तिच्या घरात झाली आहे. यासोबत तिने या घटनेबाबत तिची भावनिक बाजू शेअर केली आहे. रकुलने माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या आयुष्यातील काही घटनांचा खुलासा केला आहे.
रकुलने सांगितले की, “माझे आजी आजोबा पाकिस्तानचे आहेत. परंतु भारत आणि पाकिस्तानचे विभाजन झाले होते, तेव्हा ते भारतात आले. माझे आजोबा नेहमी म्हण्याचे की, मला पाकिस्तानला जाऊन माझे घर एकदा बघायचे आहे. जेव्हा समझौता एक्स्प्रेस सुरू झाली, तेव्हा आम्ही त्यांना पाकिस्तानला पाठवायचा प्लॅन केला होता. पण ते तिकडे एकटे राहू शकले नसते. माझे वडील आर्मीमध्ये होते. त्यामुळे ते एकटे त्यांना घेऊन जाऊ शकत नव्हते. जेव्हा माझे वडील निवृत्त झाले, तेव्हा आजोबांचे खूप वय झाले होते. मागच्या वर्षी ते आम्हाला सोडून गेले. मी जेव्हा या चित्रपटाची कहानी ऐकली, तेव्हा मला असे वाटले की, हे तर माझ्या घरात घडले आहे. त्यामुळे मला या चित्रपटाचा हिस्सा व्हायला आवडेल.”
नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात एक नातू आपल्या आजीला भेटण्यासाठी पाकिस्तान वरून भारतात येतो. जेव्हा रकुलला तिच्या मुलाखतीत विचारले की, रकुलने कधी तिच्या जवळच्या व्यक्तीची इच्छा पूर्ण करण्यासाठी अशी मेहनत घेतली आहे की?? यावर तिने उत्तर दिले की, “एवढी मेहनत नाही पण मार्चमध्ये माझ्या वडिलांचा 60 वा वाढदिवस होता, तेव्हा मी त्यांच्या एनडीएमधील सगळ्यांना बोलवले होते. एका आर्मी मॅनसाठी हेच जवळचे मित्र असतात. मी एक महिन्या आधीच प्लॅनिंग सुरू केले. सर्वांना कॉल केला पण पप्पांना याबाबत काहीच नाही सांगितले. आम्ही त्यांच्यासाठी एक सरप्राईझ पार्टी केली होती. जेव्हा ते त्यांच्या खोलीत आले आणि मुंबई, बँगलोर आणि पुणे इथील सर्व मित्रांना पाहिले, तेव्हा हे हैराण झाले. पप्पा सारखे म्हणत होते की, मुलांनी मला हैराण केले. ते खूपच भावूक झाले होते.”
चित्रपटाबाबत सांगताना रकुलने सांगितले की, “या चित्रपटात ट्रक चालवणे माझ्यासाठी चॅलेंजिंग होते. एक तर तो ट्रक खूप मोठा होता, त्याच्यावर घर ठेवलेले होते. आम्ही पटियालामध्ये रस्त्यावर होतो,त्यामुळे याच्यावर देखील लक्ष ठेवावे लागत होते की, कोणाला काही इजा तर होणार नाही ना. एकवेळा ट्रक झाडाला अडकले त्यामुळे आमचा एक तास वाया गेला. खर तर ट्रॅक एवढा मोठा होता की, तो दिसतच नव्हता. तरी पण मला असे वाटते की, मी चांगले काम केले. कबुतरच्या गल्लीतून ट्रक काढणे खूप अवघड होते. मी या आधी असे कधीच केले नव्हते तरी मी चांगले काम करू शकले.”
पर्समध्ये ठेवलेली बंदुकीची गोळी बनली मोठी समस्या
रकुलने आपल्यासोबत घडलेला एक मजेशीर किस्सा सांगितला होता. ती म्हणाली होती की, “चित्रपटाची आठवण राहण्याच्या नादात माझ्यासोबत खूप वाईट घटना घडली होती. मी आपल्या दुसऱ्या चित्रपटात पहिल्यांदा बंदूक चालवली होती. त्यावेळी खोटी बंदुकीची गोळी मी आठवण म्हणून आपल्या बॅगेत ठेवली होती आणि विसरले होते. सहा- सात महिन्यांनंतर मी ती बॅघ घेऊन विमान प्रवासासाठी निघाले होते. त्यानंतर मला दिल्ली विमानतळावर रोखले होते आणि सांगितले होते की, तुमच्या बॅगेत बंदुकीची गोळी आहे. मी तुम्हाला सांगू शकत नाही, की माझी काय व्यथा झाली होती. मी थेट रडायला सुरुवात केली होती. मला समजत नव्हते की, हे कसे काय झाले.”
“ते मला पोलीस स्टेशनला घेऊन गेले. ते चौकशी करत होते की, हे कुठून आले. मला आठवतच नव्हते. मला वाटले की, कुणीतरी माझ्या पर्समध्ये ठेवले आहे. त्यांनी मला चार तास थांबवून ठेवले होते. त्यावेळी मला आठवले. मी त्यांना चित्रपटाचा ट्रेलर दाखवला. त्यांनी गोळी तपासणीसाठी पाठवली आणि ती खोटी गोळी निघाली आणि तेव्हा कुठे जीवात जीव आला. आम्ही यानंतर यावर खूप हसलो, पण मी खूप घाबरले होते. मी ठरवले की, आता सेटवरील कोणतीही वस्तू जवळ ठेवणार नाही. ‘यारियाँ’ चित्रपटातील एक स्वेटशर्ट माझ्या जवळ आहे आणि दुसऱ्या चित्रपटातच हे कांड झाले, तेव्हापासून मी कोणत्याही गोष्टी जवळ ठेवणे सोडून दिले,” असेही पुढे बोलताना रकुल प्रीत म्हणाली.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-पांढऱ्या वाघाच्या बछड्यासोबत उर्वशीने केले ‘असे’ काही, पाहून तुम्हीही म्हणाल ‘जिगरबाज’
-एक- दोन नव्हे, तर ऋतिक रोशन एका वेळेला खातो चक्क ८ समोसे! स्वतः च केला होता खुलासा