बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट बनत असतात. काही एकदम सुपरहिट होतात तर काही फ्लॉप होतात. या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांच्या प्रतिसादावर अवलंबून असतात. चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर दिग्दर्शक किंवा कलाकार इतके खचून जातात की, त्यांना त्यातून बाहेर काढणे देखील अवघड होऊन जाते. असाच एक चित्रपट २००९ मध्ये प्रदर्शित झाला होता. तो चित्रपट म्हणजे ‘दिल्ली-६’. राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि सोनम कपूर यांनी मुख्य भूमिका निभावली होती. परंतु प्रेक्षकांना त्यांचा हा चित्रपट काही खास पसंत आला नाही. हा चित्रपट अयशस्वी झाल्यानंतर दिग्दर्शक राकेश ओम प्रकाश मेहरा यांना खूप धक्का बसला होता. नुकतेच त्यांनी त्यांच्या आयुष्यातील हा प्रसंग शेअर केला आहे की, त्यावेळी ते आत्महत्या करू इच्छित होते.
#RakeyshOmprakashMehra says he drowned himself in alcohol following #Delhi6’s failure.https://t.co/fpf11kvLHG
— Filmfare (@filmfare) July 28, 2021
ओम प्रकाश मेहरा यांनी त्यांच्या पुस्तकात प्रेक्षकांची प्रतिक्रिया आणि आत्महत्येचे येणारे विचार याबाबत देखील लिहिले आहे. त्यांनी सांगितले की, “मी अंधारातून जात होतो. मी माझं अपयश सहन करण्यास अयशस्वी ठरलो होतो. मी खूप दारू पीत होतो आणि अगदी मरेपर्यंत पिण्याची इच्छा होती. मला कधीच न उठण्यासाठी झोपायचे होते. मी माझी पत्नी आणि मुलीला त्रास देत होतो. आमच्यातील गोष्टी खराब होत चालल्या होत्या. मी त्यांच्याप्रती खूप बेजबाबदार वागत होतो जे माझ्यावर खूप प्रेम करत होते.”
#RakeyshOmprakashMehra wanted to drink himself to death after #Delhi6 failurehttps://t.co/7WMezj6ck0
— India Today Showbiz (@Showbiz_IT) July 28, 2021
त्यांनी त्यांची ऑटोबायोग्राफी ‘द : स्ट्रेंजर इन द मिरर’ मध्ये खुलासा केला की, ‘दिल्ली-६’ अयशस्वी झाल्यानंतर त्यांच्यासोबत काय झाले होते. त्यांनी सांगितले की, “चित्रपट शुक्रवारी २० फेब्रुवारी २००९ मध्ये प्रदर्शित झाला होता. रविवारपर्यंत ४० कोटीपेक्षा जास्त कमाई झाली होती. परंतु जेव्हा सोमवार आला तेव्हा प्रेक्षक अचानक चित्रपट गृहातून गायब झाले होते. मी पूर्ण खचून गेलो होतो.” (Rakyesh omprakash Mehra can not bear the failure of delhi 6 started to drink)
राकेश ओम प्रकाश मेहरा हे बॉलिवूडमधील एक नावाजलेले दिग्दर्शक आहेत. त्यांनी एका पेक्षा एक असे सरस चित्रपट दिले आहे. त्यांनी ‘रंग दे बसंती’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘मिर्जा’, ‘दिल्ली-६’, ‘तूफान’ यांसारखे चित्रपट केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-राजकुमार राव- राधिका आपटे नेटफ्लिक्सवर झळकणार एकत्र; ‘मोनिका ओ माय डार्लिंग’चा पहिला लूक आला समोर