Friday, August 1, 2025
Home साऊथ सिनेमा ऑस्कर पुरस्कार जिंकून भारतात परतल्यावर रामचरण झाला भावुक म्हणाला, ‘हा सिनेमा, गाणे आता आमचे नाही…’

ऑस्कर पुरस्कार जिंकून भारतात परतल्यावर रामचरण झाला भावुक म्हणाला, ‘हा सिनेमा, गाणे आता आमचे नाही…’

संपूर्ण जगामध्ये आरआरआर सिनेमाने आपल्या यशाचा झेंडा फडकवला असून, फक्त याच सिनेमाच्या चर्चा सध्या होताना दिसत आहे. सिनेमातील ‘नाटू-नाटू’ या गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आणि सिनेमाने देशाचे नाव अधिक उंच केले. या गाण्याची लोकप्रियता आणि प्रसिद्धी आता परदेशातही दिसून येत आहे. भारतातील लोकांवर आधीच या गाण्याने भुरळ घातली होती, आता परदेशातील लोकांना देखील या गाण्याचा मोह आवरला जात नाही. नुकतेच ऑस्कर पुरस्कार संपन्न झाले आणि या सिनेमाने सिनेमातील कलाकारांनी परदेशात जाऊन भारताचे नाव मोठे केले. आता हे सर्व कलाकार पुन्हा भारतात परतले असून, त्यांचे जंगी स्वागत देखील करण्यात आले.

सध्या सोशल मीडियावर राम चरणचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो लॉस एंजेलिस वरून पुन्हा भारतात परतला आहे. त्याच्या चाहत्यांनी त्याचे जोरदार स्वागत केले. यावेळी त्याने मीडियासोबत देखील संवाद साधला. यावेळी तो म्हणाला, “मी खूप खुश आहे, आमच्या या आनंदाचे श्रेय एस एस राजामौली, एमएम किरवाणी आणि चंद्रबोस यांना जाते. त्यांच्या अजोड मेहनतीमुळे आम्ही आज हा दिवस पाहू शकलो, ऑस्कर जिंकू शकलो.”

रामचरण पुढे म्हणाला, “‘आरआरआर’ चित्रपट बघण्यासाठी आणि ‘नाटू-नाटू’ या गाण्याला तुफान प्रेम देण्यासाठी मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे. जेव्हा आम्ही या गाण्याची शूटिंग करत होतो, तेव्हा आम्हाला स्वप्नात देखील वाटले नाही, की या गाण्याला लोकांचे एवढे प्रेम मिळेल आणि आम्ही थेट ऑस्कर पुरस्कार जिंकू. आज हा सिनेमा हे गाणे आमचे नसून तुमच्या सर्वांचे झाले आहे. खूप खूप धन्यवाद.”

भारतीयांसाठी कायमच १२ मार्च ही तारीख खास ठरणार आहे. कारण याच दिवशी जगातील सर्वात मोठ्या पुरस्कारांमध्ये भारताच्या दोन कलाकृतींना गौरवण्यात आले. गुनीत मोंगा यांची शॉर्ट फिल्म असणाऱ्या ‘द एलिफेंट व्हिस्परर्स’ने ऑस्कर जिंकला तर ‘नाटू- नाटू’ गाण्याला देखील ऑस्कर देऊन सन्मानित करण्यात आले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भारतातील मुलींच्या लग्नाच्या अवाजवी अपेक्षेवर सोनाली कुलकर्णी म्हणाली “मुलगा हवाय की मॉलमधील ऑफर?

स्वराच्या कव्वाली नाईट फंक्शनमध्ये पोहोचले अखिलेश यादव, अभिनेत्री पाेस्ट शेअर करत म्हणाली…

हे देखील वाचा