Monday, July 1, 2024

ऑस्कर सोहळ्यामध्ये ‘नाटू नाटू’ गाण्यावर रामचरणला करायचा होता डान्स, मात्र ‘या’ कारणामुळे इच्छा राहिली अपूर्ण

रामचरण आणि जुनियर एनटिआर यांच्या ‘आरआरआर’ या सिनेमाने ऑस्कर २०२३ मध्ये नेत्रदीपक कामगिरी करत या पुरस्कारावर मोहोर उमटवली. आरआरआर या सिनेमाने पुरस्कार घेण्यापासून ते स्टेजवर या गाण्यावरील परफॉर्मन्स पर्यंत सर्वच गोष्टींमधून लोकांचे मन जिंकून घेतले. सर्वच भारतीयांसाठी हा सोहळा नक्कीच खास होता. एवढे सर्व चांगले होऊनही सर्वच लोकांच्या मनात एक प्रश्न आजही कायम आहे आणि तो म्हणजे, ‘आरआरआर’चे कलाकार अभिनेता राम चरण आणि जूनियर एनटीआर त्या सोहळ्यामध्ये असूनही त्यांनी ‘नाटू नाटू’ गाण्यावर का परफॉर्मन्स दिला नाही. चाहत्यांना देखील या दोघांना ऑस्करमध्ये डान्स करताना पाहायची इच्छा अपूर्ण राहिली. यावर अजून कोणीही उत्तर दिले नव्हते मात्र आता अभिनेता रामचरणने याबद्दल सांगितले आहे.

ऑस्करनंतर झालेल्या एका मुलाखतीदरम्यान रामचरणने सांगितले की, ९५ व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये नाटू नाटू’ या गाण्यावर त्यांना देखील डान्स करायचा होता. रामचरण म्हणाला, “त्या डान्स ग्रुपने देखील शानदार परफॉर्मन्स दिला. मी तिथे परफॉर्म करण्यासाठी पूर्ण तयार होतो. मात्र त्यांचा कॉलच आला नाही. माहित नाही त्यांनी मला का कॉल केला नाही. ज्या लोकांनी तिथे हा डान्स सादर केला त्यांनी देखील उत्तम आणि आमच्यापेक्षा जास्त चांगला डान्स केला.”

पुढे रामचरण म्हणाला, “मी अनेकदा हा डान्स ब्रेक घेऊन केला आहे. आता हे आमच्यावर आहे, की आम्ही अराम करायचा आणि शो चा आनंद घ्यायचा आणि इतर कोणाला भारतासाठी डान्स करताना पाहायचे. मला असे वाटते की आता हे गाणे आमचे नाही तर भारताचे झाले आहे. या लोकांमुळेच आम्हाला ऑस्करच्या रेड कार्पेटवर चालण्याची संधी मिळाली.

दरम्यान राजामौली दिग्दर्शित आरआरआर या पिरियड ड्रामा ऍक्शन सिनेमातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला रामचरण आणि एनटिआर यांच्यावर चित्रित केले आहे. याच गाण्याला ऑस्करमध्ये पुरस्कार देखील मिळाला.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ब्रेकिंग! आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याचे दुःखद निधन, 60व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कंगना रणौत इंडस्ट्रीतील कोणालाही तिच्या घरी बोलवू इच्छित नाही! अस का म्हणाली अभिनेत्री?

हे देखील वाचा