प्रसिद्ध निर्माते- दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ब्लॉकचेनवर वेगाने वाढणाऱ्या नॉन- फंजिबल टोकन (एनएफटी)मध्ये हिंदी सिनेमा पेरला आहे. त्यांचा चित्रपट एनएफटी मार्केटमध्ये २९ कोटी रुपयांना विकला गेला आहे. राम यांचा चित्रपट पुढील महिन्यात सुमारे २० हजार चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र, यामध्ये चिनी बाजारपेठेचा समावेश नाही.
राम यांच्या या चित्रपटाचे नाव ‘लडकी’ असून त्यांनी या चित्रपटाच्या चीनी व्हर्जनचे नाव ‘द ड्रॅगन गर्ल’ असे ठेवले आहे. याला देशातील पहिल्या अशा मार्शल आर्ट चित्रपटाचे शीर्षक देखील दिले जात आहे, ज्यामध्ये एक मुलगी मुख्य भूमिका करत आहे. चित्रपटाचे ड्रॅगन टोकनही लॉन्च करण्याची तयारी सुरू आहे.
नुकतेच राम गोपाल यांच्या ‘डेंजरस’ चित्रपटाच्या अधिकारांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. आता त्यांच्या आगामी ‘लडकी/ द ड्रॅगन गर्ल’ या चित्रपटाच्या अधिकारांनाही करोडोंचा खरेदीदार मिळाला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच चर्चेत आला आहे. कारण हा इंडो-चायनीज को-प्रोडक्शनमध्ये बनलेला पहिला भारतीय मार्शल आर्ट चित्रपट आहे.
राम गोपाल यांच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, ‘लडकी/ द ड्रॅगन गर्ल’ चित्रपटाचे अधिकार ४ मिलियन म्हणजे सुमारे २९ कोटींना विकत घेण्यात आले आहेत. राम गोपाल यांच्यासाठी हा दुहेरी आनंदाचा प्रसंग ठरला आहे. चित्रपटाचे हे हक्क ट्रिकी मीडिया नावाच्या कंपनीने विकत घेतले असून, त्यात चीनचे वितरण क्षेत्र समाविष्ट नाही. ‘द ड्रॅगन गर्ल’ नावाचा हा चित्रपट चीनी भाषेत १० डिसेंबर, २०२१ रोजी चीनमधील वीस हजार चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
‘लडकी’ हा चित्रपट हिंदीशिवाय तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती आर्ट्सी मीडिया, बिग पीपल आणि चायना फिल्म ग्रूप कॉर्पोरेशन लवकरच दुबईच्या बुर्ज खलिफा येथे या चित्रपटासंदर्भात एक मोठा कार्यक्रम आयोजित करणार आहेत. ज्यामध्ये या चित्रपटाचे वेगळे पैलू जगाला दाखवले जाणार आहेत. या चित्रपटात पूजा भालेकर, शिवम मल्होत्रा आणि प्रतीक परमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
‘लडकी/द ड्रॅगन गर्ल’ या चित्रपटाचा ट्रेलरही युट्यूबवर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये पूजा भालेकरचे अप्रतिम ऍक्शन सीन आहेत. या चित्रपटात ती मार्शल आर्ट्स शिकण्यासाठी ब्रूस लीकडून प्रेरणा घेताना दिसत आहे आणि परिसरातील बदमाशांची चांगलीच धुलाई करताना दिसत आहे. या चित्रपटात राजपाल यादव आणि अभिमन्यू सिंग यांच्याही विशेष भूमिका आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-केवळ ‘जय भीम’च नाही, तर ‘हे’ चित्रपट देखील आहेत सत्य घटनांवर आधारित, टाका एक नजर
-वडिलांची परवानगी मिळाली असती, तर सलमान असता जुहीचा पती; लग्नासाठी हात मागायलाही गेला होता, पण…