एकेवेळी दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या रामायण मालिकेची लोकप्रियता आपणा सर्वांना माहितच आहे. ही त्या काळातील अशी एक मालिका होती, ज्यावेळी ती प्रसारित होत असे तेव्हा रस्त ओस पडत असे. या मालिकेची जवळपास सर्व पात्रे खूप लोकप्रिय होती. अरुण गोविल, सुनील लाहिरी आणि दीपिका चिखलिया यांनी अनुक्रमे राम, लक्ष्मण आणि सीता यांची भूमिका साकारली आहे.
तसेच अन्य कलाकारांच्या अभिनयामुळे ही ऐतिहासिक सिरीयल दर्जेदार झाला आहे. याच मालिकेतील असे काही कलाकार होते जे आज आपल्यात नाहीत. या लेखात आपण त्यांच्यांबद्दलच जाणून घेणार आहोत.
श्याम सुंदर कलानी (सुग्रीव)
रामायणात सुग्रीवाची भूमिका साकारणारे अभिनेते श्याम सुंदर कलानी यांचे गेल्या वर्षी निधन झाले. ते बराच काळ कर्करोगाशी झुंज देत होते. रामायणात त्यांनी सुग्रीवाची भूमिका केली होती. ती खरच कौतुकास्पद होती. श्याम सुंदर कलानी यांनी रामायणासोबतच ‘त्रिमूर्ती’, ‘छैला बाबू’ आणि हीर रांझा या चित्रपटांमध्ये काम केले. तसेच ‘जय हनुमान’ मालिकेमध्ये हनुमानची भूमिका साकारली होती.
विजय अरोरा (मेघनाद)
रामानंद सागर यांच्या रामायणात विजय अरोरा यांनी मेघनादाची भुमिका साकारली होती. 2007 मध्ये पोटाच्या कर्करोगामुळे 62 व्या वर्षी त्यांनी जग सोडले. त्यांनी आपल्या कारकीर्दीत 110 चित्रपट आणि 500 हून अधिक मालिकांमध्ये काम केले.
मुकेश रावल (विभीषण)
रामायणात रावणाचा भाऊ विभीषणची भुमिका मुकेश रावल यांनी साकारला होती. आजही लोकांच्या मनात त्यांचे सौम्यतेने भरलेले देखावे कैद आहेत. याशिवाय मुकेश हिंदी आणि गुजराती सिनेमा जगतातही सक्रिय होते. त्यांचा मृत्यू अतिशय दुःखद होता. 2016 मध्ये ट्रेनमधून खाली पडून त्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार ते आपल्या मुलाच्या मृत्यूच्या दु:खात होते.
ललिता पवार (मंथरा)
राणी कैकेयीची दासी मंथराची भूमिका अभिनेत्री ललिता पवार यांनी केली होती. हिंदी चित्रपट विश्वात एक जबरदस्त खलनायिका म्हणून ओळखल्या जाणार्या ललिता पवार आजही तिच्या अभिनयाने आठवल्या जातात. ललिताच्या चांगल्या अभिनयामुळे रामानंद सागर यांनी त्यांना रामायणात मंथराच्या भूमिकेची ऑफर दिली होती. मंथराच्या जबरदस्त अभिनयाने सर्वांना चकित केले होते. 24 फेब्रुवारी 1998 रोजी तोंडाच्या कर्करोगामुळे ललिता पवार यांचे निधन झाले.