सोमवारी (दि. १५ ऑगस्ट) भारतीय नागरिकांनी ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. यामध्ये बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनीही सहभाग घेतला होता. त्यांनी सर्व भारतीयांना शुभेच्छाही दिल्या. अशातच ‘रामायण’ या टीव्ही शोमधील ‘सीता’ची भूमिका करणारी दीपिका चिखलिया हिनेही स्वातंत्र्य दिवस साजरा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या. मात्र, तिच्या एका मोठ्या चुकीमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. दीपिकाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने नेमकी काय चूक केली आहे, जाणून घेऊया.
सीताने केली मोठी चूक
‘रामायण’ या टीव्ही मालिकेतून आपली ओळख निर्माण करणारी सीता अर्थातच दीपिका चिखलिया (Dipika Chikhlia) ही सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. नवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यासोबतच ती सणासुदीच्या दिवशी आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देत असते. अशात १५ ऑगस्ट हा दिवस ती कसाकाय विसरु शकते. दीपिकाने ट्विटरवर स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा करत असताना तिने एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये तिने पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. सोबतच तिने हातामध्ये तिरंगा झेंडा पकडला होता. मात्र, हा फोटो शेअर करत असताना तिच्याकडून एक खूप मोठी चूक घडली. ती म्हणजे हा फोटो शेअर करताना तिने पाकिस्तानच्या पंतप्रधानांना टॅग केले होते. मात्र, चूक समजताच तिने ते ट्वीट डिलीट केले आणि नव्याने दुसरे ट्वीट केले. असे असले, तरीही तिच्या ट्वीटचे स्क्रीनशॉट व्हायरल होत आहेत.
— Nishant Raj (@KindredNishant) August 16, 2022
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होतेय ट्रोल
दीपिकाने सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर तिने जेव्हा पाकिस्तानच्या पंतप्रधानांना टॅग केले, तेव्हा तिला जोरदार ट्रोल केले जाऊ लागले. तिला नेटकऱ्यांनी ट्रोल करत तिची खिल्ली उडवली. ट्रोल करत असताना एका युजरने रामायणमधील लक्ष्मणचा फोटो शेअर करत लिहिले की, “हे प्रभु मला तर हे मायाजाल वाटत आहे.” आणखी एका युजरने लिहिले की, “तुम्ही चुकीच्या पंतप्रधानांच्या ऑफिसला टॅग केले आहे, किंवा तुम्ही पाकिस्तानच्या पंतप्रधानांना दु:खी करण्याचा प्रयत्न करत आहात.”
पाकिस्तान के पीएमो को टैग किया हुआ स्वतंत्रता दिवस की बधाई वाला ट्वीट डिलीट क्यों कर दिया मैडम?
पोल खुल गई थी इसलिए क्या?
हवाला के जरिए मदद कहीं आप तक तो नहीं पंहुचती जिस वजह से पाकिस्तान को भी बधाई देना जरूरी समझा आपने।— ????Funny???? (@FunnyGys_) August 16, 2022
अशाप्रकारे तिच्या या व्हिडिओवर प्रतिक्रियांचा जोरदार पाऊस पडत आहे. तिचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘अशी ही बनवाबनवी’ सिनेमातील ‘या’ एव्हरग्रीन गाण्याला ‘टकाटक २’मध्ये ग्लॅमर स्पर्श
पॅपराजींमुळे शहनाजला लागला हजार रुपयांचा चुना; म्हणाली, ‘तुमच्यामुळंच झालंय हे…’
शूटिंगवेळी हॉस्पिटलमधून ‘या’ अभिनेत्याला घेऊन धावताना दिसला थालापती विजय, व्हिडिओ जोरदार व्हायरल