Wednesday, June 11, 2025
Home अन्य ‘हिंमत असेल, तर आमिर खानविरुद्ध मोर्चा काढा’, म्हणत ऍलोपॅथीमुळे चर्चेत असलेल्या रामदेव बाबांनी केला व्हिडिओ शेअर

‘हिंमत असेल, तर आमिर खानविरुद्ध मोर्चा काढा’, म्हणत ऍलोपॅथीमुळे चर्चेत असलेल्या रामदेव बाबांनी केला व्हिडिओ शेअर

रामदेव बाबा या दिवसात आयुर्वेद विरुद्ध ऍलोपॅथी औषधामुळे खूप चर्चेत आहेत. रामदेव बाबांनी ऍलोपॅथीचा मूर्ख विज्ञान असा उल्लेख केला होता. यांनतर डॉक्टर्स खूप नाराज झाले आहेत. रामदेव बाबा यांनी डॉक्टर्स आणि फार्मा कंपनीना अनेक प्रश्न विचारले आहेत. त्यांनी एक- दोन नाहीतर 25 प्रश्न विचारले आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनने त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

यावर रामदेव बाबा म्हणाले होते की, “कोणाचाही बाप त्यांना अटक करू शकत नाही.” परंतु आरोग्य मंत्री यांच्या पत्रानंतर त्यांनी त्यांचे वक्तव्य मागे घेतले आहे. परंतु हे प्रकरण अद्याप शांत झाले नाही. यातच रामदेव बाबा यांनी आमिर खानचा जुना शो ‘सत्यमेव जयते’मधील एक व्हिडिओ शेअर करून प्रश्न विचारला आहे.

आमिर खानच्या सत्यमेव जयते या शोला खूप पसंती मिळाली होती. या शोमध्ये आमिर खानने अनेक मुद्यांवर चर्चा केली. यामुळे दर्शकांना अनेक घटनांची माहिती मिळाली होती. आता रामदेव बाबा यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये डॉक्टर समित शर्मा नावाच्या एका डॉक्टरांनी बाजारात उपलब्ध औषधांवर चर्चा केली आहे. 2012 मध्ये प्रसारित झालेल्या या एपिसोडची एक क्लिप शेअर करून त्यांनी लिहिले आहे की, “या मेडिकल क्षेत्रातील लोकांची हिंमत असेल, तर त्यांनी आमिर खान विरुद्ध मोर्चा काढा.” त्यांच्या या व्हिडिओवर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

या व्हिडिओ क्लिपमध्ये डॉक्टर शर्मा आमिर खानला हे समजावत आहेत की, “औषधांची मूळ किंमत खूप कमी असते. परंतु जेव्हा आपण हे बाजारातून विकत घेतो, तेव्हा आपल्याला त्या किमतीच्या 10 ते 15 टक्के जास्त रक्कम द्यावी लागते. आपल्या देशातील जवळपास 40 कोटी लोकांना दोन वेळेचे जेवण देखील मिळत नाही, तर ते ही औषधे खरेदी करू शकतात का??” यावर आमिर खान म्हणतो की, “या औषधांची किंमत जास्त असल्याने अनेकजण ही औषधे खरेदी करू शकत नाही.”

डॉक्टर शर्मा पुढे सांगतात की, “डब्ल्यूएचओचे असे म्हणणे आहे की, भारताला स्वातंत्र्य मिळून आता 65 वर्ष पूर्ण झाले आहेत. तरी देखील देशातील जवळपास 65 टक्के लोकसंख्येकडे औषधांच्या किमती जास्त असल्याने औषधांची खरेदी करू शकत नाहीत. तसेच ते उदाहरण देत सविस्तरपणे समजावताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करून रामदेव बाबा त्यांच्या विरुद्ध बोलणाऱ्या लोकांना प्रश्न विचारत आहेत.

मागील काही दिवसांपासून डॉक्टर्स आणि रामदेव बाबा यांच्यामध्ये खूप वाद चालू आहेत. रामदेव बाबा हे ऍलोपॅथी ट्रीटमेंटबद्दल बोलले होते. त्यांनी म्हटले होते की, “कोव्हिड- 19 मध्ये लाखो लोक ऍलोपॅथी औषध घेतल्यामुळे मृत्यू पावले आहेत.” यानंतर अनेक वाद विवाद झाले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा