Friday, March 29, 2024

नुसती रेलचेल आहे भाऊ! जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची एकदा यादी पाहाच

गेल्या वर्षी २०२० मध्ये करोना काळ आणि लॉकडाऊन याचा फार मोठा परिणाम चित्रपट उद्योगावर झाला. चित्रपट गृहच बंद असल्याने अनेक सिनेमांच प्रदर्शन हे अनिश्चित काळासाठी पुढे ढकललं गेलं तर काही सिनेमे हे नाईलाजाने ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित गेले. गेल्या वर्षीच्या शेवटच्या काही महिन्यात सरकारने सिनेमगृहांना उघडण्यास परवानगी दिली, सिनेमे देखील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाले परंतु जिवाच्या भीतीपोटी म्हणा की अजून काही परंतु प्रेक्षकांचा ओघ सध्या चित्रपटगृहांकडे तसा कमीच आहे. परंतु नव्या वर्षात असं नाहीये. नव्या वर्षात उत्तमोत्तम सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.

याची झलकच म्हणूयात जी आपल्याला या महिन्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण शेवटी ७० एमएमची स्क्रीन आणि बंद खोली असं थिएटरचं स्वरूप त्यातील शेकडो जणांसोबत एकत्र सिनेमा पाहण्याची भावना हे दुसरीकडे कुठेच येऊ शकत नाहीत. त्यामुळे उत्तमोत्तम सिनेमे यावर्षाच्या पहिल्याच महिन्यात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहेत.

रामप्रसाद की तेरहवी
नसीरुद्दीन शाह आणि सुप्रिया पाठक यांचा रामप्रसाद की तेरहवी हा चित्रपट नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या सिनेमातून सीमा पाहवा यांनी दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. याशिवाय चित्रपटात कोंकणा सेन, विक्रांत मेसी, विनय पाठक आणि मनोज पाहवा, नासीरुद्दीन शाह आणि सुप्रिया पाठक यांच्यासोबत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहेत. आता या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळेल हे या येत्या काही दिवसात कळेलच.

हाथी मेरे साथी
राणा डग्गुबाती आणि पुलकित सम्राटचा चित्रपट हाथी मेरे साथी 15 जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या मनात प्राण्यांवरील तुमचे प्रेम नक्कीच वाढायला मदत होईल. आपण विचार करत असाल हा चित्रपट जुन्या हिंदी हाथी मेरे साथीचा रिमेक तर नाही ना…तर तसं नाहीये म्हणजे हिंदीतील जुन्या सिनेमाचा नाही परंतु कादन या तामिळ तर अरण्य या तेलगू सिनेमाचा हा हिंदी रिमेक आहे. या सिनेमाच्या दाक्षिणात्य व्हर्जन मध्ये राणा आणि विष्णू विशाल यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या तर हिंदी मध्ये विष्णू विशाल याची भूमिका पुलकित सम्राट याने साकारली आहे.

१२ ओ क्लॉक
राम गोपाल वर्माचा १२ ओ क्लॉक हा चित्रपट ८ जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, मकरंद देशपांडे, दिव्या जगदाळे, मानव कौल, अली असगर, दलीप ताहिल हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा हॉरर चित्रपट आहे. राम गोपाल वर्मा बर्‍याच दिवसांनी पुन्हा भयपट प्रकारात परतला आहे.

मेरे देश की धरती
दिव्येन्दू शर्मा आणि अनुप्रिया गोयंकाचा चित्रपट मेरे देश की धरती चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट २२ जानेवारीला देशभरात प्रदर्शित होणार आहे. मेरे देश की धरती हा शेतकऱ्यांच्या वाईट परिस्थितीवर लक्ष केंद्रित करणारा चित्रपट आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी म्हणजेच २०२० मध्ये प्रदर्शित होणार होता पण लॉकडाऊनमुळे रिलीजची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.

सूर्यवंशी
रोहित शेट्टी दिग्दर्शित तसेच अक्षय कुमार स्टारर सिनेमा सूर्यवंशी खरंतर गेल्यावर्षी मार्च मध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु अचानक आलेल्या कोव्हीडमुळे चित्रपटाचं प्रदर्शनच लांबलं होतं. हा चित्रपट या महिन्यात २६ जानेवारीला प्रदर्शित होईल अशी सगळीकडे चर्चा सुरू होती परंतु आता खरंच गणराज्य दिनी हा चित्रपट प्रदर्शित होणार की याची प्रदर्शनाची तारीख आणखीन पुढे ढकलणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हे देखील वाचा