बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार आपल्या ‘रामसेतू’ या आगामी चित्रपटासाठी खूपच उत्सुक असल्याचे दिसत आहे. याचा प्रत्यय आपल्याला त्याच्या सोशल मीडिया पोस्टवरून येतो. तो आपल्या चित्रपटाशी निगडीत प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकतेच त्याने आपल्या चित्रपटाच्या शूटिंगबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. तो या चित्रपटात वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. आपल्या लूकबद्दलही त्याने चाहत्यांना त्यांचे मत मांडायला सांगितले आहे.
अक्षयने चित्रपटातील आपल्या पहिला लूकचा फोटो शेअर करत लिहिले की, “माझ्या सर्वाधिक महत्त्वपूर्ण चित्रपटांपैकी एक असलेल्या चित्रपटाची शूटिंग आजपासून सुरू झाली आहे. #RamSetu शूटिंगची सुरुवात…. एका पुरातत्वशास्त्रज्ञाची भूमिका साकारत आहे. लूकवर तुमचे मत जाणून घ्यायचे आहे. हे नेहमीच माझ्यासाठी महत्त्वाचे असते.”
अक्षयच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हार्ट इमोजी, फायर इमोजीमार्फत चाहते अक्षयच्या लूकवर प्रतिक्रिया देत आहेत.
The journey of making one of the most special films for me begins today. #RamSetu shooting begins! Playing an archaeologist in the film. Would love to hear your thoughts on the look? It always matters to me???????? @Asli_Jacqueline@Nushrratt@Abundantia_Ent@LycaProductions pic.twitter.com/beI6p0hO0I
— Akshay Kumar (@akshaykumar) March 30, 2021
चाहत्यांच्या कमेंट्स
एका चाहत्याने लिहिले की, “हे खूपच शानदार आहे.” दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, “पुरातत्वशास्त्रज्ञाचा आता नवीन चेहरा आहे आणि हा खूपच अप्रतिम आहे.” आणखी एका चाहत्याने कमेंट केली की, ‘सर, विग तुम्हाला शोभत नाहीये. तुमचे नैसर्गिक केस खूप चांगले वाटतात.’ त्याचबरोबर एका चाहत्याने ‘सर्वोत्तम लूक’ म्हटले आहे.
एकूणच चाहत्यांनी रामसेतूमधील अक्षयच्या नवीन लूकला चांगले म्हटले आहे.
चित्रपटात दिसणार ‘या’ दोन अभिनेत्री
काही दिवसांपूर्वीच चित्रपटातील संपूर्ण कलाकार मुहूर्त शूटसाठी अयोध्याला पोहोचले होते. जॅकलीन फर्नांडिस, नुसरत भरूचा आणि संपूर्ण टीमचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होते. अभिषेक शर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला ‘रामसेतू’ चित्रपट भारतीय संस्कृती आणि ऐतिहासिक वारश्याशी निगडीत कथा पडद्यावर आणणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-