Thursday, December 5, 2024
Home बॉलीवूड एका डोळ्याने दिसत नसूनही साऊथसोबतच बॉलिवूडमध्ये देखील केला ‘या’ अभिनेत्याने आपल्या अभिनयाने धमाका

एका डोळ्याने दिसत नसूनही साऊथसोबतच बॉलिवूडमध्ये देखील केला ‘या’ अभिनेत्याने आपल्या अभिनयाने धमाका

एका सिनेमातील संवाद खूपच प्रसिद्ध आहे की, “किसी चीज को अगर चाहो तो पूरी कायनात उसे मिलाने की कोशिश करती है” मात्र ही चाहत पूर्ण करण्यासाठी आपल्याला मेहनत आणि संघर्ष या दोन गोष्टींची जोड आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्ती त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जंगजंग पछाडतात. अनेक चढउतार पार करत त्यांचे ध्येय गाठतात. याला मनोरंजनविश्वात काम करणारे कलाकार देखील अपवाद नाही. कलाकार त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक समस्यांवर मात करतात. आता अभिनेता राणा डग्गुबत्तीचे उदाहरण घ्या. अतिशय आकर्षक, धिप्पाड आणि लक्षवेधी देहयष्टी, उत्तम अभिनय असलेल्या राणाने देखील त्याच्या अशाच एका मोठ्या समस्येवर मात करत या क्षेत्रात स्थान मिळवले आहे. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rana Daggubati (@ranadaggubati)

आपल्या सर्वांनाच माहित आहे की, डोळे हा आपल्या सर्वांच्या शरीराचा अविभाज्य घटक आहे. डोळ्यांशिवाय आपण आपल्या जगाची कल्पनाच करू शकत नाही, डोळे नसलतील तर किती, कोणत्या आणि काय काय समस्या उदभवतील याचा अंदाज न बांधणेच योग्य. मात्र याच डोळ्यांच्या एका मोठ्या समस्येवर मात करून राणाने या मनोरंजनविश्वात मोठे यश संपादन केले आहे. दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या राणाने ‘बाहुबली’ सिनेमात ‘भल्लाळदेव’ ही भूमिका केली आणि त्याच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. या भूमिकेने त्याला अमाप लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवून दिली. अतिशय निरोगी आणि सदृढ देह असणाऱ्या रानबद्दल आम्ही आता तुम्हाला जे सांगणार आहोत त्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. मात्र हे त्याच्या आयुष्यातील एक मोठे सत्य आहे. राणा डग्गुबत्तीला एका डोळ्याने दिसत नाही.

हो, हे खरे आहे. एका मुलाखतीदरम्यन खुद्द राणानेच याचा खुलासा केला होता. त्याने या मुळतीमध्ये सांगितले की, “मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? मी माझ्या उजव्या डोळ्याने काहीच पाहू शकत नाही. मला फक्त माझ्या डाव्या डोळ्याने दिसते. जर मी माझा डावा डोळा बंद केला तर मला काहीच दिसत नाही.” एवढेच नाही तर त्याचा डावा डोळा देखील कोणीतरी त्याला मेल्यानंतर दान केला आहे. त्याला लहानपानापासूनच दिसत नव्हते. त्याच्या डोळ्यांचे ऑपरेशन देखील झाले आहे. एका रिपोर्टनुसार राणाने एका शो दरम्यान डोळ्यांचा त्रास असणाऱ्या महिलेला समजवताना त्याच्या या त्रासाबद्दल देखील सांगितले होते. त्याच्या या मोठ्या खुलाशाने त्याच्या चाहत्यांसोबत सर्वांनाच मोठा धक्का बसला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rana Daggubati (@ranadaggubati)

मात्र एक गोष्ट नक्कीच खरी आहे, एवढा मोठा त्रास किंवा एवढी मोठी त्रुटी असूनही राणाने कधीच त्याची हिंमत ढासळू दिली नाही. त्याच्या या कामाला कधीच त्याची कमजोरी होऊ दिली नाही आणि कधीच यामुळे त्याच्या यशात कोणत्या समस्या निर्माण झाल्या. जवळपास मागील आठ वर्षांपासून राणा या क्षेत्रात कार्यरत आहे. त्याने त्याच्या या वर्षांमध्ये अनेक लहान मोठ्या भूमिका केल्या. सौथसोबतच बॉलिवूडमध्ये देखील चांगले नाव कमावले आणि ‘बाहुबली’ने तर त्याला संपूर्ण जगातच प्रसिद्ध केले. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर त्याने २०२० मध्ये त्याची मैत्रीण असलेल्या मिहिका बजाजसोबत लग्न केले. या लग्नाला केवळ ५० लोकं होते. त्याच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

 

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा