Thursday, July 18, 2024

रणबीर-आलियाच्या लग्नाला ‘या’ दिग्गजांना केले नाही आमंत्रित, जुनी प्रेमप्रकरणे आली उजेडात

हिंदी चित्रपट जगतात सध्या एका शाही विवाह सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. या विवाह सोहळा आहे चॉकलेट बॉय रणबीर कपूर आणि बॉलिवूडची ड्रामा गर्ल आलिया भट्टचा. आलिया (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) प्रेम प्रकरणाची बॉलिवूड जगतात बराच काळ चर्चा रंगली होती. या दोघांनी या बातम्यांना अधिकृत दुजोरा दिला नसला, तरी अनेकदा ते एकत्र फिरताना दिसले होते. त्यामुळे त्यांच्या प्रेमप्रकरणाचा माध्यमांना सुगावा लागला होता. आता या बहुचर्चित प्रेमप्रकरणाचा थेट लग्नााने गोड शेवट होणार असल्याने, त्यांच्या चाहत्यांना चांगलाच आनंद झाला आहे. त्यांच्या लग्नाची जय्यत तयारी सध्या सुरू असून चित्रपट जगतातील रथी- महारथी या लग्नाला उपस्थित राहणार आहेत. मात्र तरीही या लग्नाला हिंदी चित्रपट जगतातील काही प्रमुख अभिनेते आणि अभिनेत्रींना निमंत्रण देण्यात आले नाही. कोणते आहेत ते कलाकार चला जाणून घेऊ.

अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नाची बातमी अखेर समोर आली असून, या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. येत्या सात ते आठ दिवसात दोघेही मुंबईच्या आर. के हाऊसमध्ये लग्नगाठ बांधणार आहेत. या विवाह सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील ४५० लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र काही दिग्गज कलाकारांना या विवाह सोहळ्यासाठी आमंत्रित केले नसल्याचीही माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये बॉलिवूडचा दबंग सलमान खान, कॅटरिना कैफ, कंगना रणौत, सिध्दार्थ मल्होत्रा या कलाकारांचा समावेश आहे.

अभिनेता सलमान खान आणि रणबीर कपूरचे हितसंबंध चांगले नसल्याने, तो लग्नात येण्याची शक्यता खूपच कमी आहे. रणबीर आणि सलमान खानमध्ये कॅटरिना कैफमुळे वाद निर्माण झाला होता, त्यामुळे त्यांच्यात मतभेद झाले होते. याच कारणाने सलमानला लग्नात बोलावले नसल्याचे कारण सांगितले जात आहे. तसेच कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूरचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते .ते दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्यांच्यात वाद झाल्याने हे नाते संपुष्टात आले. यामुळेच कॅटरिना कैफही या लग्नात दिसणार नाही.

आलिया भट्ट आणि कंगणाचा वाद तर जगजाहीर आहे. आलियाच्या प्रत्येक चित्रपटावर सडकून टीका करण्याचे काम कंगना करत असते. त्यामुळे त्यांच्यात नेहमीच छत्तीसचा आकडा तयार झाला आहे. यामुळे कंगनाही या लग्नात उपस्थित राहणार आहे. तर अभिनेता सिध्दार्थ मल्होत्रा आणि आलियाचे प्रेमप्रकरणही चांगलेच गाजले होते. मात्र सिद्धार्थला सोडून आलिया रणबीरच्या प्रेमात पडल्याने, तो सुद्धा या लग्नात हजर राहणार नाही. त्यामुळे या शाही विवाह सोहळ्याला बॉलिवूडमधील गाजलेले कलाकारच येणार नसल्याचे चित्र दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा