Monday, July 1, 2024

‘रिलेशनशिपमध्ये येणे सोपे मात्र…’ रणबीर आणि श्रद्धा कपूर यांच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

नुकताच दिग्दर्शक लव रंजन यांच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अशा ‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर ही फ्रेश जोडी सर्वांना पाहायला मिळणार आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये श्रद्धा आणि रणबीर यांच्यात अनेक बोल्ड सीन्स असल्याचे दिसत असून, श्रद्धा आणि रणबीर यांचा लूक देखील चर्चेत आला आहे. सिनेमाच्या नावानुसारच रणबीर खोट्या प्रियकराच्या भूमिकेत दिसत असून, श्रद्धा अप्रामाणिक प्रियसीच्या भूमिकेत दिसेल. सिनेमाचे ट्रेलर सोशल मीडियावर चांगलाच गाजत असून, नेटकऱ्यांनी ते सिनेमाची वाट बघत असल्याचे सांगितले आहे.

ट्रेलरमधून सिनेमाची कहाणी नीटशी लक्षात आली नसली तरी, या सिनेमात अशी जोडी दिसते जिला प्रेम तर करायचे, मात्र सोबत राहायचे नाही. रणबीर सुरुवातीलाच म्हणतो, ‘आजकाल रिलेशनशिपमध्ये येणे सोपे आहे, मात्र त्यातून बाहेर पडणे अवघड आहे.’ श्रद्धा देखल अशाच प्रकारे विचार करणारी मुलगी आहे. हा ट्रेलर पाहून सिनेमा रोमॅंटिक कॉमेडी स्वरूपाचा असल्याचे जाणवत आहे. रणबीरच्या मित्राच्या भूमिकेत स्टँडअप कॉमेडियन असलेल्या अनुभव सिंग याने लक्ष वेधून घेतले असून, त्याच्या विनोदांनी सिनेमाला एक वेगळाच टच मिळत आहे. हा ट्रेलर पाहून रणबीरची बायको अभिनेत्री आलिया भट्टने देखील सिनेमासाठी वाट पाहू शकत नसल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, रणबीर-श्रद्धाचा हा चित्रपट होळीच्या पार्श्वभूमीवर अर्थात ८ मार्च २०२३ दिवशी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग ‘तू झूठी मैं मक्कार’या चित्रपटाचे निर्माते असून दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आम्ही चित्रपट केलेच नाहीत तर…’, बॉलिवूड बॉयकॉट ट्रेंडवर बोलली प्रसिद्ध अभिनेत्री

केएल राहुल अन् अथियाच्या संगीतात ‘बेशरम रंग’वर थिरकले स्टार, पाहा भन्नाट व्हिडिओ

हे देखील वाचा