Wednesday, July 3, 2024

आजी बनण्याच्या बातम्यांवर नीतू कपूरची प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘संपूर्ण जगाला…’

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) सोमवारी (२७ जून) माहिती दिली, की ती लवकरच आई होणार आहे. ही बातमी समोर येताच कपूर आणि भट्ट कुटुंबात सेलिब्रेशनची तयारी सुरू झाली आहे. आलियाची आई सोनी राजदान, रणबीरची बहीण रिद्धिमा कपूर आणि करण जोहर (Karan Johar) यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी इंस्टाग्रामवर खास पोस्ट शेअर करून या जोडप्याचे अभिनंदन केले आहे. करण जोहर आलियाला आपली मुलगी मानतो आणि ती आई बनल्याच्या बातमीने तो खूप भावूक झाला आहे. त्याचवेळी आजी नीतू कपूरही (Neetu Kapoor) ही बातमी ऐकल्यानंतर खूप आनंदी दिसत आहेत.

काय म्हणाल्या नीतू कपूर
आलियाने पोस्ट शेअर केल्यानंतर पॅपाराजींनी नीतू कपूरला शुभेच्छा दिल्या, तेव्हा अभिनेत्री आश्चर्यचकित झाली. त्यांनी विचारले कशाचे अभिनंदन? पॅपाराजींनी ‘आजी झाल्याबद्दल अभिनंदन नीतू जी, जुग जुग जिओ’, असे म्हटले. यावर मजेशीर प्रतिक्रिया देताना नीतू म्हणाल्या, ‘आता जुग जुग जियो नाही, आता शमशेरा’. थोड्याच वेळात नीतू कपूर हळू आवाजात म्हणाल्या, ‘मी आजी होणार आहे हे सगळ्या जगाला कसं कळलं.’ याला उत्तर देताना पॅपाराजींनी सांगितले की, आलियाने सकाळीच तिच्या इन्स्टा पोस्टवर याची घोषणा केली आहे, तेव्हा नीतू आश्चर्यचकित झाल्या. (ranbir kapoor alia bhatt pregnancy reaction of neetu kapoor)

इथे पाहा व्हिडिओ

सोनी राजदानची प्रतिक्रिया
आलिया भट्टची आई सोनी राजदान हिनेही आजी बनण्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले, “आम्हाला आमच्या गरजेपेक्षा जास्त मिळाले.” यासोबतच आपला आनंद व्यक्त करताना त्यांनी लिहिले, “सर्वोत्तम बातमी.” त्याचवेळी, रणबीरची बहीण रिद्धिमा साहनी कपूरनेही इन्स्टा स्टोरीवर पोस्ट शेअर केली आणि लिहिले, “माझ्या बेबीजला बेबी होणार आहे, तुम्हा दोघांना खूप खूप प्रेम.”

आलियाने तिच्या गरोदरपणाची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिने अल्ट्रासाऊंड अपॉइंटमेंट घेत असतानाचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले की, “आमचे बाळ लवकरच येत आहे.” या फोटोमध्ये आलिया हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेली दिसत आहे. तिच्या बेडच्या शेजारी कोणीतरी बसले आहे, ज्याची मागची बाजू दिसत आहे. बहुधा तो अभिनेता रणबीर कपूरच असावा. दोघेही अल्ट्रासाऊंड मशीनच्या मॉनिटरकडे बघत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा