Tuesday, July 9, 2024

आय्यो..! एक नाही आलियाच्या पोटात दोन-दोन बाळ? रनालियाला होणार जुळं?

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या केवळ त्यांच्या व्यावसायिकच नाही, तर वैयक्तिक आयुष्यासाठीमुळेही खूप चर्चेत आहेत. या वर्षी एप्रिलमध्ये दोघांनी खासगी समारंभात लग्न केले होते, ज्यामध्ये फक्त त्यांचे जवळचे नातेवाईक आणि मित्र सामील झाले होते. त्याचवेळी, लग्नाच्या तीन महिन्यांनंतर आलियाने चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आणि ती गर्भवती असल्याचे सांगितले. आता पुन्हा एकदा या जोडप्याकडून दुसरी आनंदाची बातमी समोर येत आहे.

आजकाल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर दोघेही त्यांच्या कामासह त्यांच्या मुलाच्या येणाच्या टप्प्याचाही आनंद घेत आहेत. आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणबीर-आलिया हे जुळ्या मुलांचे पालक होणार आहेत. (ranbir kapoor alia bhatt reportedly expecting twins baby)

एका प्रसिद्ध ज्योतिषाने भाकित केले आहे की, चिमुकल्यांच्या रडण्याचा आवाज या जोडप्याच्या घरात गुंजेल. सोशल मीडियावर पसरलेल्या बातम्यांनुसार, लग्नाच्या तीन महिन्यांतच आलियाचा एवढा मोठा बेबी बंप असण्यामागे जुळी मुले देखील कारण असू शकतात. याची पुष्टी झाली नसली, तरी चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. हे जर खरे ठरले, तर कपूर कुटुंबाला दोन मुलं जन्माला येतील.

बेबी बंपसह विमानतळावर स्पॉट झाली आलिया
अलीकडेच आलिया तिच्या हॉलिवूड चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’चे शूटिंग पूर्ण करून युरोपमधून भारतात परतली आहे. यादरम्यान ती एअरपोर्टवर मोठ्या बेबी बंपसोबत स्पॉट झाली होती. दुसरीकडे, या जोडप्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, आलिया आणि रणबीर ‘ब्रह्मास्त्र’मधून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत. याशिवाय रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ हा चित्रपटही २२ जुलै रोजी रिलीझ होण्यासाठी सज्ज आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा