Thursday, October 16, 2025
Home बॉलीवूड रणबीर-आलियाच्या प्राणीप्रेमाचे कौतुक, लग्नानिमित्त संग्रालयाकडून मिळाली ‘ही’ खास भेट

रणबीर-आलियाच्या प्राणीप्रेमाचे कौतुक, लग्नानिमित्त संग्रालयाकडून मिळाली ‘ही’ खास भेट

ज्या विवाह सोहळ्याची सर्वांना आतुरता लागली होती तो आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) शाही विवाह सोहळा थाटामाठात पार पडला. बॉलिवूड जगतातील अनेक दिग्गज कलाकारांनी या लग्नाला उपस्थिती लावली होती. मुंबईच्या कपूर फॅमिलीच्या घरी हा विवाह सोहळा पार पडला. सध्या सोशल मीडियावर सर्वत्र या लग्नाचीच चर्चा पाहायला मिळत आहे. बॉलिवूड जगतातील दिग्गज घराणी असलेल्या कपूर आणि भट्ट फॅमिलीने या लग्नासाठी जय्यत तयारी झाली होती. मात्र हा विवाह सोहळा पार पडल्यानंतर आलिया आणि रणबीरलाा मिळालेल्या दोन घोड्यांचीच सर्वत्र चर्चा होत आहे काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.  

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या प्रेमप्रकरणाची अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. शेवटी या सगळ्या चर्चांंना पूर्णविराम देत दोघांनीही लग्नाच्या बेडीत अडकत सर्वांनाच सुखद धक्का दिला. त्यांचा हा शाही विवाह सोहळा मोठया जल्लोषात पार पडला. मात्र हा जल्लोष साजरा करताना त्यांनी काही बाबी आणि प्रथा जाणीवपूर्वक टाळत प्राणीमात्रांबद्दलचे प्रेम दाखवले आहे. म्हणजेच रणबीर आलियाच्या लग्नात घोडे वगेरे वापरण्यात आले नाहीत. मोठमोठ्या समारंभात अनेक घोडे वापरत मोठ्या मिरवणूका काढल्या जातात. मात्र अशा गोष्टींमुळे प्राण्यांना इजा होते, त्रास होतो. याच गोष्टी लक्षात घेऊन रणबीर आलियाने अशा प्रकारच्या मिरवणूका टाळल्या आहेत त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

त्यांचा हा सामाजिक सलोखा लक्षात घेत एका प्राणिसंग्रालयाने त्यांना एक घोडा आणि घोडीची जोडी भेट दिली आहे. आणि त्याची नावेही रणबीर आलिया अशीच ठेवण्यात आली आहेत. ही जोडी आधी अशाच प्रकारच्या लग्न समारंभासाठी वापरली जात होती. पांढऱ्या शुभ्र रंगाची ही जोडी खूपच सुंदर दिसत आहे. या व्हायरल जोडीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. तसेच आलिया आणि रणबीरच्या या प्राणीप्रेमाचेही कौतुक होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा