Tuesday, July 9, 2024

बाबो.! फ्लॅटमध्ये उरकलं आलिया-रणबीरचं लग्न, पण लग्नाचे फोटो-व्हिडिओ विक्रीतून कमावलेत ‘इतके’ कोटी

संपुर्ण बॉलिवूड जगताला ज्या गोष्टीची आणि लग्नाची आतुरता लागली होती. तो शाही विवाह सोहळा शेवटी थाटामाटात पार पडला. अनेक दिवसांपासून या लग्नाची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) लग्नाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. अनेक दिवसांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चांना पुर्णविराम देत या जोडीने कायमचीच लग्नाची गाठ बांधण्याचा निर्णय घेतला. मात्र या लग्न सोहळ्याबाबत माध्यमांना मात्र जास्त माहिती न देता त्यांनी लांबच ठेवले होते. त्यामुळे त्यांनी या लग्नाबाबत इतकी गुप्तता का पाळली असाच प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला होता. आता त्यांच्या या लग्नाचे सगळे फोटो आणि व्हिडिओ फूटेज यांबद्दलची थक्क करणारी माहिती समोर आली आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, रिपोर्ट्सनुसार, रणबीर आणि आलियाचे लग्न खाजगी ठेवण्यात आले आहे कारण एका मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मला लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ स्ट्रीम करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. मात्र, रणबीरच्या टीमने या बातमीला दुजोरा दिलेला नाही आणि आलियाच्या टीमकडूनही याबाबत कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार येत्या काही महिन्यांत रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नाचे फुटेज ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अपलोड केले जातील. इतकंच नाही तर लग्नाचे व्हिडिओ आणि फोटोंचे हक्क आलिया आणि रणबीरने या ओटीटी प्लॅटफॉर्मला मोठ्या रकमेत विकल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार, आलिया आणि रणबीरने त्यांचे लग्नाचे हक्क ओटीटी प्लॅटफॉर्मवर तब्बल 90 ते 110 कोटी रुपयांना विकले आहेत.

दरम्यान या बातम्यांना आत्तापर्यंत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पण तसं झालं तरी आश्चर्य वाटण्याच कारण नाही कारण रणबीर आणि आलियाची ब्रँड व्हॅल्यू इतकी जास्त आहे की त्यांच्यासाठी ती फार मोठी गोष्ट नाही. आलिया आणि रणबीर निवडक चित्रपट करतात, पण त्या चित्रपटांसाठी दोघेही भरमसाट फी घेतात. या व्यतिरिक्त, दोन्ही ब्रँड एंडोर्समेंटद्वारे देखील भरपूर कमाई करतात. त्यांची लोकप्रियता आणि प्रसिद्धीच इतकी आहे की हे त्यांच्यासाठी काही विशेष नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

हे देखील वाचा