Monday, July 8, 2024

आलिया अन् रणबीरच्या लग्नावर पुन्हा एकदा ग्रहण, ‘या’ कारणामुळे लांबवण्यात आली लग्नाची तारीख

बॉलिवूडमधील अनेक कलाकार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत अशा जोरदार चर्चा चालू आहे. यातील सर्वात जास्त चर्चेत असणारे नाव म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट होय. ते दोघे अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अशा बातम्या आल्या होत्या की, ते दोघे डिसेंबर २०२१ मध्ये लग्न करणार आहे. परंतु त्यांच्या नात्याला पुन्हा एकदा ग्रहण आले आहे आणि त्यांचे लग्न पुढे ढकलले आहे. नुकतेच दोघांनी एकत्र दिवाळी साजरी केली आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावेळी त्यांच्या चाहत्यांना असे वाटत होते की, ते लवकरच आता त्यांच्या लग्नाची घोषणा करतील.

त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाची खूप वाट बघत होते. या वर्षी ते नक्की लग्न करतील अशी सगळ्यांना आशा होती. परंतु माध्यमातील वृत्तानुसार या वर्षी देखील रणबीर आणि आलियाने त्यांचे लग्न लांबवले आहे. (Ranbir Kapoor and alia bhatt are not going to marry in 2021 is a shocking update for fans) याचे कारण म्हणजे त्यांच्या व्यवसायिक आयुष्यातील कामाबाबत असणारी कमिटमेंट असे सांगितले जात आहे. त्याचबरोबर कपूर आणि भट्ट कुटुंबाला देखील असे वाटते की, ते दोघे लग्न करतील तेव्हा ते फ्री असावेत. कारण त्यांना थाटामाटात त्यांचे लग्न करायचे आहे.

परंतु ते दोघे ही त्यांच्या लग्नासाठी पूर्ण टाईम देऊ इच्छुतात. त्यामुळे त्यांना घाई करायची नाही. त्यांना त्यांचा तो दिवस सगळ्यांच्या आठवणीत राहील एवढा स्पेशल बनवायचा आहे. माध्यमातील वृत्तानुसार रणबीर आणि आलिया २०२२ मध्ये लग्न करणार आहे. परंतु नक्की कोणत्या महिन्यात लग्न करणार आहेत याची माहिती समोर आली नाही.

रणबीर आणि आलियाकडे अनेक नवीन प्रोजेक्ट आहेत. आलिया लवकरच ‘गंगुबाई कठियावाडी’ आणि ‘आरआरआर’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच ती रणवीर सिंगसोबत ‘रॉकी आणि राणी की प्रेम कहाणी’मध्ये दिसणार आहे. तसेच रणबीर कपूर आनंद एल.रायसोबत पहिल्यांदाच श्रध्दा कपूरसोबत दिसणार आहे. तसेच तो ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटात आलिया भट्टसोबत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आलिया- रणबीर अन् कॅटरिना- विकीच्या आधी राजकुमार अन् पत्रलेखा थाटणार आपला संसार; मित्रांना पाठवले निमंत्रण?

-वाढदिवसाच्या सेलिब्रेशननंतर रणबीरने आलियासोबत घेतला जंगल सफारीचा आनंद, व्हिडिओ आणि फोटो व्हायरल

-आलियासाठी बॉडीगार्ड बनला रणबीर! चाहत्यांच्या गर्दीत अभिनेत्रीचे संरक्षण करताना दिसला अभिनेता

हे देखील वाचा