Monday, July 15, 2024

ठरलं एकदाचं..! ‘या’ तारखेला, ‘या’ ठिकाणी आणि ‘या’ लोकांच्या उपस्थितीत होणार आलिया-रणबीर यांचं लग्न

गेल्या काही आठवड्यांपासून रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाबाबत मनोरंजन विश्वामध्ये सतत चर्चा होत आहे. अशातच बातम्या येत होत्या की, रणबीर आणि आलिया एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लग्न करणार आहेत. मुंबईतील चेंबूर येथील आरके हाऊसमध्ये त्यांच्या लग्नाचे विधी पार पडणार असल्याचेही म्हटले जात होते. मात्र, याबाबत रणधीर कपूर (Randhir Kapoor) यांना विचारले असता, त्यांनी याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले. सर्व अफवांच्या दरम्यान आता रणबीर आणि आलियाच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. होय! या महिन्याच्या १७ तारखेला हे लोकप्रिय जोडपं रेशीमगाठीत अडकेल.

कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक होणार सहभागी
रणबीर आणि आलियाचे लग्न हे बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असणारे लग्न ठरणार आहे. एका वृत्तसाइटने आपल्या अहवालात जोडप्याच्या जवळच्या एका सूत्राचा हवाला देत म्हटले आहे की, रणबीर-आलिया १७ एप्रिल रोजी लग्न करणार आहेत. आलियाच्या आजोबांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यामुळे हे जोडपे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात लग्न करण्याच्या विचारात आहेत. सूत्राने सांगितले की, “आलियाचे आजोबा एन रझदान यांना तिचे रणबीरसोबत लग्न बघायचे आहे. १७ एप्रिल रोजी एक अतिशय खासगी विवाह नियोजित करण्यात आला आहे, ज्यामध्ये फक्त कुटुंब आणि जवळचे लोक सहभागी होणार आहेत. तसेच हे लग्न आरके स्टुडिओमध्ये होणार असून, अशी कोणतीही वेगळी योजना अद्याप बनवण्यात आलेली नाही.” (ranbir kapoor and alia bhatt marriage date confirmed)

पाहुण्यांची यादी नाही आली समोर
या बहुचर्चित लग्नात सहभागी होणाऱ्या पाहुण्यांच्या यादीबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. याशिवाय लग्नाच्या विधी एक-दोन दिवस होणार आहेत.

उदयपूरमध्ये होत्या लग्नाच्या चर्चा
याआधी रणबीर आणि आलिया राजस्थानच्या उदयपूरमध्ये लग्न करू शकतात, अशीही चर्चा होती. कारण दोघे बऱ्याचदा उदयपूरला जाताना दिसले होते.

कामात व्यस्त आहेत दोन्ही कलाकार
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर रणबीर आणि आलिया दोघेही सध्या खूप व्यस्त आहेत. दोघांनी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात एकत्र काम केले आहे. याशिवाय आलियाकडे ‘रॉकी और रानी की प्रेमकथा’ आणि ‘डार्लिंग्स’ चित्रपट आहेत. तर रणबीर ‘शमशेरा’ चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा